Share

वयाच्या ८८ व्या वर्षी भारताचे ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन करणार भाजपात प्रवेश

Published On: 

नवी दिल्ली : दिल्लीपासून कोचीपर्यंत मेट्रो सेवेने देशाला जोडण्यात महत्वाची भूमिका बजावलेले ई श्रीधरन वयाच्या ८८ व्यावर्षी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. श्रीधरन यांना मेट्रोमॅन म्हणूनही ओळखले जाते. केरळमध्ये ई. श्रीधरन यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती केरळ भाजपाचे के. सुरेंद्रन यांनी दिली.

ई. श्रीधरन यांची मेहनत आणि बुद्धीमत्तेमुळेच दिल्ली मेट्रोसारखी स्वप्ने साकार झाली. ई. श्रीधरन यांना भारत सरकारने पद्मविभूषण, पद्मश्री प्रदान केले आहे.२१ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या भाजपाच्या विजय यात्रेदरम्यान ई. श्रीधरन औपचारिकरित्या भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. केरळमधील आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

यावर्षी केरळ विधानसभा निवडणुका होणार आहेत, अशा वेळी श्रीधरन पक्षाचे सदस्यत्व घेणार आहेत. दक्षिण भारतात पक्षाचा विस्तार व्हावा या उद्देशाने भाजप येथे विजय यात्रा सुरू करत आहे. 21 फेब्रुवारी रोजी रथ यात्रा कासारगोड येथून सुरू होईल आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात तिरुअनंतपुरम यात्रेचा शेवट होईल.

विकासकामांमधील योगदानासाठी त्यांना फ्रान्स सरकारनेसुद्धा गौरवलं आहे. 2005 मध्ये त्यांना ‘Chavalier de la Legion d’honneur’ पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तसंच अमेरिकेच्या टाइम मॅगझिनने ई श्रीधरन यांना आशियाचा हिरो असंही म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!