मुंबई : युपीएचे सरकार लोकशाही मार्गाने चालणारे सरकार होते म्हणूनच ७० रुपये लिटर पेट्रोल झाले. त्यावेळी अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षयकुमार आणि इतर सेलिब्रिटींनी त्या इंधन दरवाढीविरोधात ट्विट करून संताप व्यक्त केला होता.
काल गांधी भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले यांनी बॉलीवूड अभिनेत्यांसह मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. दरम्यान, आजही नाना पटोले याच मुद्द्यावरून अमिताभ बच्चन व अक्षयकुमार यांच्यावर बरसले आहेत. अमिताभ आणि अक्षय यांना शेतकऱ्यांचा विसर पडल्याने, त्यांच्या चित्रपटाचे शुटींग आणि त्यांचे सिनेमे बंद पाडू, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे.
याच पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस मुंबई येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी नाना पटोले यांनी घेतलेल्या भूमिकीवर जोरदार टीका केलेली आहे. नाना पटोले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून केवळ प्रसिद्धीच्या पाठीमागे लागलेले आहेत. त्यांनी घेतलेली ही भूमिका ही केवळ प्रसिद्धीसाठीच आहे. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शुटींग आणि त्यांचे सिनेमे बंद पाडून नाना पटोले नेमके काय सिद्ध करणार आहेत? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान ‘अमिताभ आणि अक्षय मनमोहन सिंह यांचे सरकार असताना ट्वीटरच्या माध्यमातून टीव टीव करायचे. इंधन दरवाढीवर टीका करायचे.आज ते का गप्प आहेत? केंद्र सरकारच्या देशविरोधी धोरणाविरुद्ध त्यांनीही भूमिका मांडावी. अन्यथा आम्ही आक्रमक पवित्रा घेऊ’, अशी तंबी नाना पाटोले यांनी दिलीय.
महत्त्वाच्या बातम्या
- पंजाबातील निकालांमुळे भाजपला धक्का; अमित शहांनी घेतली तातडीची बैठक
- भाजपच्या सर्व संचालकांना घरी बसवणार : आ. आंबादास दानवे
- ‘मौत का कुआँ’ बनलेल्या ‘त्या’ विहिरीजवळ रस्त्याच्या दुसऱ्या बाजूचेही काम सुरू
- शुद्धीवर न आलेल्या महिलेची आखेर ओळख पटली; गुढ मात्र कायम
- ‘चिनीसैन्य माघार घेत असल्याचा उत्सव म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेची बनवाबनवीच’


