Share

राम गोपाल वर्मा अडचणीत! ५६ लाखाची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा अडचणीत सापडले आहेत. एका प्रोडक्शन हाऊसच्या मालकाकडून ५६ लाख उधार घेतले, पण पैसे परत न दिल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. माहितीनुसार, वर्मा यांच्याविरुद्ध मियापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, २०२० मध्ये वर्मा यांनी ‘दिशा’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी पैसे घेतले होते. पण परत त्यांनी ते पैसे परत दिले नाहीत.

जानेवारी २०२० च्या पहिल्या आठवड्यामध्ये वर्मा यांनी ८ लाख रुपये घेतल्याचा आरोप प्रोडक्शन हाऊसच्या मालकाने केला आहे. त्यांनतर त्यांनी परत २० लाख रुपये कर्ज द्या, अशी विनंती केली. २२ जानेवारी २०२० मध्ये कर्जाच्या स्वरूपात वर्मा यांना रक्कम देण्यात आली. त्यावेळी वर्मा यांनी सहा महिन्यांमध्ये रक्कम परत करेल, असं आश्वासन दिले. तक्रारदाराने पुढे म्हंटले कि, वर्मा यांनी नंतर फेब्रुवारी २०२० च्या दुसऱ्या आठवड्यात देखील चित्रपट निर्मितीची आर्थिक गरज सांगून २८ लाख रुपये मागितले होते.

संचालकांना विश्वासात घेऊन परत एकदा वर्मा यांना २८ लाख रुपये दिले. यांनतर ‘दिशा’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ५६ लाख रुपये परत करेल असं अश्वासन त्यांनी दिले. पण तक्रारदाराला २०२१ मध्ये समजले की वर्मा ‘दिशा’ चित्रपटाचा निर्माता नाही. खोटे आमिष दाखून त्यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!