Share

छकुलीचा ‘पोटरा’ कान्समध्ये गाजतोय; इकडे तिच्या झोपडीला मात्र गळती…

Published On: 

सोलापूर : ‘पोटरा’ चित्रपटाने सोलापूर जिल्ह्यातील आष्टीच्या पालावरील छकुलीचे नाव सातासमुद्रपालीकडे पोहचवले. राज्यभरातून तिचे कौतुकही होत आहे, आता हा चित्रपट कान्समध्ये गाजतोय. मात्र, छकुलीच्या घराची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. तिच्या कुटुंबियांना उदरनिर्वाह भगवण्यासाठी भिक्षा मागावी लागते, तिच्या घरात अजून ही वीज पोहंचलेली नाहीये. राज्य सरकारने या सर्व गोष्टींची दखल घेत १ लाख रुपयांची मदत ही जाहीर केलीय. मात्र ती अद्याप छकुलीच्या कुटुंबापर्यंत पोहचलीच नाही. त्यामुळे छकुलीने घराबाबद शासनाकडे मागणी केली आहे.

 

आज ही तिच्या घरातील सदस्यांना पालावरच राहावं लागत आहे. अधूनमधून येणाऱ्या अवकाळी पावसामुळे झोपडीला गळती लागते आणि घरभर पाणी होत असल्याच चित्र आहे. मोहोळ तालुक्यातील शिरपूरचे तरुण दिग्दर्शक शंकर धोत्रे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पोटरा’ चित्रपटाची कान्स मोहोत्सवासाठी निवड झाली. तेंव्हा त्यात भूमिमा करणारी छकुली देवकर काय करतेय, याकडे सिनेरसिकांचे लक्ष गेले. तिच्या पालकांची हालाकीची स्तिती मात्र अजूनही कायम आहे.

छकुलीच्या कुटुंबियांना उदरनिर्वाह भगवाण्यासाठी भिक्षा मागावी लागते, तिच्या घरात अजून ही वीज पोहंचलेली नाहीये. राज्य सरकारने या सर्व गोष्टींची दखल घेत १ लाख रुपयांची मदत ही जाहीर केलीय. मात्र ती अद्याप छकुलीच्या कुटुंबापर्यंत पोहचलीच नाही. त्यामुळे तात्काळ पक्क्या घराची सोय शासनाने करावी अशी मागणी छकुलीने केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!