मुंबई: ओबीसी आरक्षणावरून पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. भाजपकडून या पार्श्वभूमीवर आंदोलनही केले जात आहे. लवकरच स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. यासंदर्भातच मंत्री जयंत पाटील () यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशनात आज प्रदेशाध्यक्ष नजयंत पाटील बोलत होते. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ नयेत, ही राष्ट्रवादी काँग्रेसची आग्रही मागणी आजही आहे. सुप्रीम कोर्टाने कोणताही निकाल दिला असला तरी कोर्टाच्या चौकटीत बसवून आरक्षणासहीत निवडणुका घेण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न आहेत, त्यांची सोडवणूक करून ओबीसी समाजाला मदत करण्याचे काम आपल्याला करायचे आहे. ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी न्यायालयीन लढाईवर आपण लक्ष केंद्रीत केले आहे. असे जयंत पाटील यांनी म्हटले.
ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ नयेत, ही राष्ट्रवादी काँग्रेसची आग्रही मागणी आजही आहे, असे ते म्हणाले. सुप्रीम कोर्टाने कोणताही निकाल दिला असला तरी कोर्टाच्या चौकटीत बसवून आरक्षणासहीत निवडणुका घेण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. pic.twitter.com/h7VjudsYAX
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) May 25, 2022
ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी देखील होत आहे. परंतु २०११ सालीच जातनिहाय जनगणना झालेली आहे. मी त्यावेळी ग्रामविकास मंत्री होतो त्यामुळे मला याची माहिती आहे. २०१४ साली त्याचा तपशील देखील केंद्र सरकारकडे देण्यात आला होता. मात्र तो तपशील नंतर आलेल्या सरकारने बाहेर काढला नाही. त्यामुळे देशात जातनिहाय जनगणनेचा तपशील बाहेर आला तर आपल्याला सबळ पुराव्याची व्यवस्था होईल. मात्र सध्या हे होईल, असे वाटत नाही.
आज राष्ट्रवादी ओबीसी सेलमार्फत काही ठराव करण्यात आले आहेत. या सर्व ठरावांना मी पूर्णपणे पाठिंबा देतो. ओबीसींच्या अनेक जाती आणि बारा बलुतेदार यांचे अनेक प्रश्न आहेत. या ठरावांचा तपशील घेऊन राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत बसून यावर तोडगा काढण्याचा नक्कीच प्रयत्न करु, असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले. तसेच ओबीसींच्या आरक्षणाविषयी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ एकटेच बोलत आहेत. पण ओबीसी सेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे की, त्यांनी देखील गावागावात, जिल्ह्याजिल्ह्यात जाऊन बोलले पाहीजे. असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Women’s T20 Challenge 2022 SNO vs VEL : हरमनप्रीत कौरचा ‘ सुपरवुमन’ अंदाज! घेतला जबरदस्त कॅच; पाहा VIDEO!
- “संजय राऊत तुमचा सत्तेचा माज…”, संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
- IPL 2022 GT vs RR : जुन्या संघाचं स्वप्न भंगवलं..! मॅचविनिंग खेळीनंतर डेव्हिड मिलरचा राजस्थान रॉयल्सला मेसेज; म्हणाला…
- रिलीजपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पाहणार ‘पृथ्वीराज’ चित्रपट
- “मोदींच्या नावावर ज्यांनी मत घेतली त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी…” – किरीट सोमय्या

