Share

खतांच्या किमतीवरून रक्षा खडसे यांचा भाजपला घरचा आहेर ,म्हणाल्या…

Published On: 

जळगाव : गेल्या काही महिन्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोकं वर काढले आणि त्यातच पेट्रोल, डिझेल सोबतच घरगुती गॅस, डाळी, खाद्यपदार्थांच्या किंमतींचे दरही आस्मानाला भिडले आहेत. यामुळे सामान्य माणूस त्रस्त झाला असून घर चालवायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित होत आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसताना आता खासगी रासायनिक खतांच्या किंमतीमध्येही सरासरी ६०० ते ७०० रूपये एवढी विक्रमी दरवाढ केली गेली आहे.

यामुळे या खतांच्या दरवाढीला आता विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला जबाबदार धरत टीकास्त्र सोडलं आहे. परंतु आता भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी देखील यावरून भाजपला घरचा आहेर दिला आहे. रासायनिक खते विशेषतः मिश्र खते यांची दर वाढ त्वरित मागे घेऊन खतांच्या भावावर नियंत्रण आणण्याबाबत खासदार रक्षा खडसेंनी केंद्रीय रासायनिक व उर्वरक मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून मागणी केली आहे. दरम्यान, भाजप खासदार रक्षा खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. खतांच्या वाढलेल्या किमती कमी केल्या जाव्या अशी केंद्राकडे रक्षा खडसे यांनी मागणी केली आहे.

शेतकरी आधीच विपरीत परिस्थितीशी सामना करत आहे त्यामध्ये मागील वर्षात पिकलेले धान्य व इतर शेती पिकांना योग्य असा भाव पण मिळाला नसल्यामुळे हवालदिल झालेला शेतकरी आता ह्या नवीन खरीप हंगामासाठी शेती कामाचे नियोजन गोंधळात आहे. त्यामध्येच खताची ही भाव वाढ म्हणजे दुष्काळात तेरवा महिन्या सारखे आहे.

रासायनिक व उर्वरक मंत्री केंद्र सरकार यांना रक्षा खडसे यांनी विनंती करत रासायनिक खताची ह्या वेळेस केलेल्या भाव वाढ हि पूर्णतः मागे घ्यावी व कोव्हीड महामारीच्या या देशात आलेल्या विपरीत परिस्थिती जोपर्यंत सामान्य होत नाही तो पर्यंत अशी कुधालीही रासायनिक व मिश्र खते यांची भाव वाढ होऊ नये ह्या साठी लागणारे उपाय योजना करावी जेणे करून शेतकऱ्यांवर कुठलाही नवीन भार पडणार नाही व शेतकरी बांधव ह्या परिस्थिती मध्ये सुद्धा आपल्याला शेती पिके उपलब्ध करून देईल.

त्यामुळे माझी केंद्र सरकारला कळकळीची विनंती आहे की सध्या तरी रासायनिक व मिश्र खते यांची भाव वाढ हि पूर्णतः मागे घ्यावी व मागील वर्षी असलेल्या किमंती मध्येच राज्याच्या केलेल्या मागणीनुसार वेळेवर साठा उपलब्ध करून द्यावा ही अशी विनंती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर व रासायनिक व उर्वरक मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे रक्षा खडसे यांनी यावेळी पत्राद्वारे केली आहे.

दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी दरवाढीवर नाराजी व्यक्त करत खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तात्काळ दरवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात संबंधित खात्याचे केंद्रीय केमीकल आणि फर्टीलायजर मंत्री सदानंद गौडा यांना खत दरवाढीच्या विरोधात पत्र लिहिले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!