Share

‘..तेव्हा कोणत्या बिळात लोळत होतात?, पडळकरांचा काँग्रेसवर पलटवार

Published On: 

मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारने एमपीएससीची परीक्षा रद्द केल्यानंतर पुण्यातील रस्त्यावर झोपून आंदोलन केले होते. त्यामुळे, विद्यार्थ्यांनीही या आंदोलनात मोठा सहभाग घेतला. त्यानंतर, एमपीएससीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. आता, युपीएससीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

एमपीएससी परीक्षा स्थगित केल्यानंतर गोंधळ घालणारे आता कुठे गेले? असा थेट सवाल भाई जगताप यांनी विचारला आहे. यावर त्यांनी एक ट्वीट करत ही टीका केली आहे. खरंतर, एमपीएसी परीक्षा रद्द केल्यानंतर राज्यभर अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आली आहे. त्यावर भाई जगताप यांनी भाजपला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला.

याला गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘नाव बदलल्याने जसे ‘भाई’ होता येत नाही तसेच माझ्या महाराष्ट्राच्या बांधवांच्या वेदना समजता येत नाही… काल चक्री वादळात तुंबलेली मुंबई थांबली, पडली, झडली, खचली, तेव्हा आपण विरोधी पक्ष म्हणून कोणत्या बिळात लोळत होता की हप्ता वसूली करत होता?’ असा सवाल पडळकरांनी विचारला आहे.

काय म्हणाले होते भाई जगताप?
भाई जगताप यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, ‘राज्य सरकारने MPSC ची परीक्षा रद्द केली म्हणून रस्त्यावर लोळण घेऊन आंदोलन करणारे, केंद्र सरकारने UPSC ची परीक्षा रद्द केल्यावर आता हे महाराष्ट्र द्रोही कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत? आता दातखिळी बसली आहे का??’ अशा शब्दात जगताप यांनी गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!