मुंबई : ‘केंद्र सरकारने महाराष्ट्राला सुमारे पाच हजार व्हेंटिलेटर दिले. पहिल्या लाटेत व्हेंटीलेटरची मागणी अचानक वाढली. परदेशातही तुटवडा होता. युद्धपातळीवर त्यांची निर्मिती झाली. त्यांची रचना काहीशी गुंतागुंतीची आहे. आपण ते गोदामात थप्पी मारून ठेवले तर कसे होणार.’ असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.
‘राज्यातील नव्वद टक्के व्हेंटिलेटर व्यवस्थित सुरू आहेत. दहा टक्के नादुरूस्त असले तरी दुरूस्ती इंजिनिअर पाठविले आहेत. या विषयावरून राजकारण करण्याचा प्रयत्न कुणी करू नये असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे. मात्र, काँग्रेसने यावरूव देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘केंद्राने दिलेले तकलादू व्हेंटिलेटर सुरू करून दाखवाच’ असे आव्हान काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.
ट्विटद्वारे सावंत म्हणाले की, ‘पीएम केअर फंडातून महाराष्ट्राला केंद्र सरकारने दिलेले ज्योती सीएनसी कंपनीचे व्हेंटिलेटर पूर्णतः तकलादू असल्याचे अहवाल सांगतो. मोदींची प्रतिमा जनतेच्या जीवापेक्षा महत्वाची मानणाऱ्या फडणवीस जी आणि चंद्रकांत पाटील यांनी हे तकलादू व्हेंटिलेटर चालू करुन दाखवावे असे आमचे आव्हान आहे.’
#PMCares फंडातून महाराष्ट्राला केंद्र सरकारने दिलेले ज्योती सीएनसी कंपनीचे व्हेंटिलेटर पूर्णतः तकलादू असल्याचे अहवाल सांगतो. मोदींची प्रतिमा जनतेच्या जीवापेक्षा महत्वाची मानणाऱ्या फडणवीस जी आणि चंद्रकांत पाटील यांनी हे तकलादू व्हेंटिलेटर चालू करुन दाखवावे असे आमचे आव्हान आहे pic.twitter.com/8lDE6v6ASp
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 18, 2021
दरम्यान, पीएम केअर फंडातून औरंगाबादला देण्यात आलेले १८५ व्हेंटिलेटर्स नादुरुस्त आहेत. संबंधित कंपनीच्या इंजिनिअर्सनी ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, मात्र न जमल्याने तेही निघून गेले आहेत. शक्य असेल तर दुरुस्ती करावी, अन्यथा हे व्हेंटिलेटर्स बदलून द्यावेत. यामध्ये रुग्णांच्या जिवाशी खेळ नको, अन्यथा हे व्हेंटिलेटर्स साभार परत करावे लागतील, असा इशारा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या
- ‘..तेव्हा कोणत्या बिळात लोळत होतात?, पडळकरांचा काँग्रेसवर पलटवार
- जन्म-मृत्यू एकत्रच! जुळ्या भावांचा कोरोनामुळे सोबतच मृत्यू
- ‘रस्त्यावर लोळणाऱ्यांची आता दातखिळी बसली का?’, भाई जगतापांनी पडळकरांना डिवचले
- शिवसेना आ. प्रताप सरनाईक बेपत्ता? ईडी, सीबीआयची लोणावळ्यातील रिसॉर्टवर धाड
- काँग्रेस आ.प्रणिती शिदेंच्या बैठकीला प्रचंड गर्दी, आमदारासह माजी खासदारांवर गुन्हा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

