🕒 1 min read
मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.
अशी सर्व भीषण परिस्थिती असताना मात्र महाराष्ट्रातील राजकारण मात्र काही केल्या थांबत नसल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ‘केंद्र सरकारने महाराष्ट्राला सुमारे पाच हजार व्हेंटीलेटर दिले. पहिल्या लाटेत व्हेंटीलेटरची मागणी अचानक वाढली. परदेशातही तुटवडा होता. युध्दपातळीवर त्यांची निर्मिती झाली. त्यांची रचना काहीशी गुंतागुंतीची आहे. आपण ते गोदामात थप्पी मारून ठेवले तर कसे होणार.’ असा टोला त्यांनी लगावला आहे.
तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘राज्यभरातील नव्वद टक्के व्हेंटीलेटर व्यवस्थित सुरू आहेत. दहा टक्के नादुरूस्त असले तरी दुरूस्ती इंजिनिअर पाठविले आहेत. या विषयावरून राजकारण करण्याचा प्रयत्न कुणी करू नये. कोरोनाच्या या भीषण संकटात जनतेला धीर देण्यासाठी आपण राज्यभर फिरतो. या आपत्तीत राजकारण किंवा टीका टिप्पणी करण्यात मला स्वारस्य नाही. प्रत्यक्ष परिस्थीतीची पाहून राज्य सरकारला सुचना करण्यावर माझा भर असतो.’ असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पोलिसांची पुन्हा आरोग्य सहायकास मारहाण!
- काँग्रेस आ.प्रणिती शिदेंच्या बैठकीला प्रचंड गर्दी, आमदारासह माजी खासदारांवर गुन्हा
- पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त पोस्टरप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
- ‘खतांच्या किमती कमी न झाल्यास राज्य सरकार सबसिडी देणार’, मंत्री सुभाष देसाई यांची माहिती
- मोदी राजा नाही, टीका करणे हा लोकशाहीचा अधिकार-प्रकाश आंबेडकर

