नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा 70 वा दिवस आहे. दिल्लीच्या सिंधू, टिकरी आणि गाझीपूर बॉर्डरवर आंदोलक शेतकरी अजूनही तळ ठोकून आहेत. शेतकरी नेते राकेश टिकैत आज हरियाणातील जिंद इथं महापंचायतीला संबोधित करण्यासाठी पोहोचले आहेत. टिकैत यांचं भाषण ऐकण्यासाठी शेतकरी आणि महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील जिंदमध्ये महापंचायत सुरु होती. त्यावेळी शेतकरी आंदोलक आणि नेते महेंद्रसिंह टिकैत उपस्थित असलेल्या व्यासपीठाचे दोन भाग कोसळले. त्यावेळी राकेश टिकैत यांनी परिस्थिती सावरत व्यासपीठ तर भाग्यवान लोकांचे तुटतात, अशी कोटी केली. हरियाणाच्या जिंदमध्ये कंडेला इथं शेतकऱ्यांची महापंचायत सुरु आहे. या महापंचायतीला संबोधित करण्यासाठी महेंद्रसिह टिकैत उपस्थित झाले आहेत. या ठिकाणी 50 खाप पंचायतीचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. यावेळी टिकैत यांचं भाषण ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी झाली आहे. त्याच दरम्यान टिकैत उपस्थित असलेल्या व्यासपीठाचे दोन भाग कोसळल्याची घटना घडली आहे.
तर, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. त्यासाठी पोलिसांनी गाझीपूर सीमा, टिकरी बॉर्डर आणि सिंधु बॉर्डरवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. काही ठिकाणी सिमेंटचे बॅरिकेट्सही लावण्यात आले आहेत. त्याशिवया रस्त्यावर मोठमोठे खिळे ठोकण्यात आले असून अनेक ठिकाणी भिंतीही उभारल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून सोनपेठमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
- शरजील उस्मानी विरोधात पुण्यात गुन्हा दाखल
- कोरोना काळात सीसीटीव्हीच्या कामात मोठा गैरव्यवहार : आमदार मुदंडा
- जाणून घ्या : स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे तुमच्या वाहनांच काय होणार ?
- ‘फडणवीसांना हिंदुंचा एवढाच कळवळा, तर मग उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही’?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

