Share

कोरोना काळात सीसीटीव्हीच्या कामात मोठा गैरव्यवहार : आमदार मुदंडा

Published On: 

बीड: कोरोनाच्या संसर्ग काळात प्रशासनातील अधिकारी आणि ठेकेदारांनी खिसे भरल्याचा आरोप भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी केला आहे. कोविड रुग्णालयात बसवण्यात खुप मोठा गैरव्यवहार झाला असल्याचे आमदार मुंदडा यांचे म्हणणे आहे. मंगळवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी हे आरोप केले.

कोरोना काळात उपचार सामग्री सोडून दुरुस्त्या, रंगरंगोटी आणि इतर खरेदीवर निधीची उधळण केली असल्याचे आमदार मुदंडा म्हणतात. आपल्या मतदार केज तालुक्यात दवाखान्यात सीसीटीव्ही बसवण्यात मोठा घोटाळा झाला असल्याचे त्यांनी सांगितले. केजच्या जिल्हा रुग्णालय आणि अंबाजोगाई येथे उभारलेल्या कोविड रुग्णालयातही सीसीटीव्ही बसविण्यासाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. लाखो रुपये खर्च केलेले हे सीसीटीव्ही सुरूच नसल्याचे समोर आले आहे. हा दाखवलेला खर्च अवास्तव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या कामाच्या जर निविदा काढल्या असत्या तर त्या स्पर्धेत आणि बाजार भावाच्या सहाय्याने या साहित्याला तीन लाख खर्च अला असता. पण त्यासाठी २५ लाख खर्च करण्यात आला. तसेच निविदा काढण्याचा हक्क हा एनआयसी(नॅशनल इन्फोर्माटीकस् सेंटर) कडे असताना जिल्हा शल्यचिकीत्सक यांनी निवीदा का काढल्या असा सवाल आमदार मुदंडा यांनी केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!