पुणे : एल्गार परिषदेतील आपल्या भाषणात शरजील उस्मानी याने ‘हिंदू समाज सडका झालाय’ अशा प्रकारच वक्तव्य करून धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे शलजिलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत होती.यासंदर्भात भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अॅड. प्रदीप गावडे यांनी ही तक्रार दाखल केली होती.
याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शरजील उस्मानी याच्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे हा गुन्हा दाखल केला आहे. शरजील उस्मानी वर १५३ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला असून यांसदर्भात पुणे पोलिसांनी तपास सुरु केला असल्याची माहिती सध्या मिळत आहे.
मंगळवारी एल्गार परिषदेवर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. “शरजील उस्मानी नावाचा कोणीतरी सडक्या डोक्याचा व्यक्ती एल्गार परिषदेत हिंदूविरोधी वक्तव्य करतो. त्यानंतरही राज्य सरकार कोणतीही कारवाई करत नाही. राज्यात मोगलाई आली आहे का, हिंदू रस्त्यावर पडलेत का?” असा सवाल त्यांनी केला होता. फडणवीसांच्या आक्रमक भूमिकेनंतर पुण्यातील भाजप नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या
- नेवासे तालुक्यातील रस्त्यांना ‘शंभर कोटी’चा निधी, नेवासा -शेवगाव रस्त्याची साडेसाती सुटणार
- रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग नंतर मिया खलिफा उतरली शेतकऱ्यांच्या समर्थनात !
- आगामी कसोटी सामन्यातील भारताच्या कामगिरीवर इंग्लंडच्या दिग्गजाचे भाष्य !
- मनपा कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू होणार
- शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणे हे शिवसेनेचे ढोंग; संजय निरूपमांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

