Share

पक्षातून कचरा गेला म्हणून कॉंग्रेसकडून लाडू वाटप

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कॉंग्रेस राष्ट्रवादीचे नेते भाजपात प्रवेश केला आहे. मुंबईतील गरवारे क्लब येथे ही मेगा भरती झाली आहे. या भरतीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे, वैभव पिचड, संदीप नाईक तर काँग्रेसचे कालिदास कोळंबकर. तसेच राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे.

यावरून काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी भाष्य करताना प्रसारमाध्यमांतून असे दाखवण्यात आले की काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात चिंतेचे आणि दुःखाचे वातावरण आहे, मात्र आमच्याकडे असे कोणतेही वातावरण नाही. आम्हाला १३५  वर्षांचा इतिहास आहे. आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास आहे अस मत व्यक्त केले.

तसेच पुढे बोलताना, जे भाजपमध्ये जात आहे ते गद्दारच होते. यापूर्वीदेखील त्यांनी पक्षांतर केले आहे. नायगाव वडाळामधून एक प्रकारचा कचरा गेला आहे, स्वछता झाली आहे. यांचा आनंद कार्यकर्त्याना झाला आहे. हाच आनंद व्यक्त करण्यासाठी लाडू वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता असंही वाघमारे म्हणले.

दरम्यान, वाघमारे यांच्या निशाण्यावर कालिदास कालिदास कोळंबकर हे होते. त्यामुळे त्यांनी नायगाव वडाळामधून एक प्रकारचा कचरा गेला आहे अशा प्रकारच वक्तव्य केले आहे.

राधाकृष्ण विखे पाटलांनी योग्य मार्ग दाखवला, म्हणून मी भाजपात : पिचड

आम्ही सोबतच, १५ दिवसांत जागावाटपाबाबत निर्णय घेणार : देवेंद्र फडणवीस

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!