टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तर मुंबईतील गरवारे क्लब येथे पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला आहे. या पक्ष प्रवेशावेळी राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे, वैभव पिचड, संदीप नाईक तर काँग्रेसचे कालिदास कोळंबकर. तसेच राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे.
यावेळी पिचड पिता – पुत्रांचा भाजप प्रवेश हा चर्चेचा विषय ठरला आहे. कारण मधुकर पिचड हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक सदस्य होते. तर राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अतिशय जवळचे नेते होते. मात्र त्यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी पिचड म्हणाले की, माझे वय ७९ आहे. आज काही मागणार नाही. केवळ एक इच्छा आहे, हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा. देश ज्या दिशेने जातोय, त्या दिशेने जावे ही कार्यकर्त्यांची भावना आहे, त्यामुळेच आज भाजपमध्ये केला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा मार्ग दाखवला असल्याचे सांगत विखेंचे पिचड यांनी आभार मानले.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी सत्ताधरी भाजपकडे पळ काढला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाचे अस्तित्व निवडणुकी आधीचं धोक्यात आले आहे. सचिन आहिर , गणेश नाईक या मुंबई आणि नवी मुंबईतील नेत्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्याने राष्ट्रवादी पक्षाचे मुंबईतील अस्तित्व संपल्यात जमा आहे. तर नगरमध्येही अशीच काहीशी स्थिती पाहिला मिळत आहे. राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक मधुकर पिचड यांचे पुत्र आणि अकोले मतदारसंघाचे आमदार वैभव पिचड यांनी देखील राष्ट्रवादीला राम-राम ठोकला आहे.
महत्वाच्या बातम्या
राष्ट्रवादीला अजून एक धक्का; ‘हा’ माजी खासदारही भाजपच्या वाटेवर?
‘काँग्रेस-राष्ट्रवादीचे ५० पेक्षा अधिक आमदार भाजपाच्या संपर्कात’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

