कोल्हापूर : गेल्या काही महिन्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोकं वर काढले आणि त्यातच पेट्रोल, डिझेल सोबतच घरगुती गॅस, डाळी, खाद्यपदार्थांच्या किंमतींचे दरही आस्मानाला भिडले आहेत. यामुळे सामान्य माणूस त्रस्त झाला असून घर चालवायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित होत आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसताना आता खासगी रासायनिक खतांच्या किंमतीमध्येही सरासरी ६०० ते ७०० रूपये एवढी विक्रमी दरवाढ केली होती.
यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला होता. यासोबतच, भाजप मधील विविध नेत्यांनी देखील खत दरवाढ रद्द करावी अशी मागणी केली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे खतांच्या दरात कपात केल्याचं जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारात दरवाढ झाल्यानंतरही खताची किंमत अर्ध्याने कमी केली आहे.
यानंतर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ट्विटरद्वारे या निर्णयाचं स्वागत करून उद्याच आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आहे. ‘केंद्र सरकारने रासायनिक खतांची केलेली दरवाढ मागे घेतली, शेतकर्यांच्या एकजुटीचा हा मोठा विजय आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उद्याचे आंदोलन स्थगित केले गेले आहे,’ असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.
केंद्र सरकारने रासायनिक खतांची केलेली दरवाढ मागे घेतली, शेतकर्यांच्या एकजुटीचा हा मोठा विजय आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उद्याचे आंदोलन स्थगित केले गेले आहे.@ANI @narendramodi
— Raju Shetti (@rajushetti) May 19, 2021
काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?
‘केंद्र सरकार शेतकऱ्यांचं जीवन अधिक चांगलं बनवण्यासाठी कटिबद्ध आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय बाजारभावात वाढ झाल्यानंतरही आम्ही जुन्याच दराने खत देण्याचं ठरवलं आहे. आजच्या निर्णयानंतर DAP खताची एक बॅग २४०० ऐवजी १२०० रुपयांमध्ये मिळेल,’ अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मी एक चांगला सहकारी व मित्र गमावला, राजीव सातवांच्या आठवणीत राहुल गांधी भावूक
- मोदी फक्त गुजरातचेच प्रधानमंत्री, अशा संकट काळात पण त्यांना फक्त गुजरातच दिसतोय !
- समुद्रातून १८४ जणांची सुटका करून INS कोची मुंबईत दाखल, २२ जणांचा मृत्यू
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार कोकण दौऱ्यावर; चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार !
- …म्हणून मुंबई महापालिकेवर सदोष वृक्षवधाचा गुन्हा दाखल करणार ; भाजप आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

