मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुऴे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मोठं नुकसान झालं. अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब पडले आहेत. घराचं नुकसान झालं आहे. तौक्तेमध्ये गुजरातमधील २७ जणांनी जीव गमावल्याचे वृत्त आहे. गुजरातमधील किनारी भागात या वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे.
तर या भीषण वादळाने महाराष्ट्राचे देखील भयंकर नुकसान केले असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तौत्के चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे बॉम्बे हाय परिसरात अडकलेल्या कर्मचाऱ्यांचे बचावकार्य सुरु आहे. हिरा ऑईल फील्डमधील ‘बार्ज पी- 305’ वर अडकलेल्या जवळपास 184 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात तटरक्षक दल आणि शोध पथकांना यश आलं. दुर्दैवाने या घटनेत सहा जणांना प्राण गमवावे लागले असून त्यांचे मृतदेह सापडले आहेत.
मुंबईजवळच्या समुद्रात बुडलेल्या P 305 बार्जवरून सुटका केलेल्या 184 पैकी १२५ जणांना घेऊन नौदलाचं INS कोची जहाज मुंबईत दाखल झालंय. या घटनेत एकूण 22 जणांचा मृत्यू झाला आहे त्यापैकी 14 मृतदेहही आणण्यात आले आहेत. ONGCचे अनेक कर्मचारी अजूनही बेपत्ता असून नौदलाची शोध मोहीम सुरू आहे.
#WATCH | A crew member of Barge P305 breaks down while speaking of Indian Navy's rescue operations. He was rescued by INS Kochi and brought to Mumbai.
A total of 184 people have been rescued so far, search and rescue operations are still going on.#CycloneTauktae pic.twitter.com/7e8JU3zcT5
— ANI (@ANI) May 19, 2021
P 305 बार्ज ही भारतात तेल उत्पादन करणाऱ्या ONGC कंपनीची असून तौक्ते वादळाच्या तडाख्यामुळे या बार्जला समुद्रात रोखून धरणारे नांगर निघाले. नौदलाने गेल्या काही काळात राबवलेल्या सर्वांत कठीण बचाव मोहीमांपैकी ही एक मोहीम आहे. गल कन्स्ट्रक्टर या आणखी एका बार्जवरील 137 जणांनाही नौदल आणि तटरक्षक दलानं मंगळवारी सहीसलामत वाचवलं. कुलाबा पॉइंटपासून भरकटलेलं हे जहाज पालघरमधल्या माहिमजवळ गेलं होतं.
अरबी समुद्रात रेस्क्यू ऑपररेशन अद्यापही सुरुच आहे. बार्ज पी – 305 वरील काही जणांनी आपला जीव वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या होत्या. एक रात्र आणि एक दिवस पाण्यात राहिलेल्या या कर्मचाऱ्यांना वाचवण्यातही तटरक्षक दलाला यश मिळाल आहे. यामुळे आता सर्वच स्तरातून नौदलांच्या सैन्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- मी एक चांगला सहकारी व मित्र गमावला, राजीव सातवांच्या आठवणीत राहुल गांधी भावूक
- ग्लोबल टेंडरही काढलं मात्र, अद्याप एकाही कंपनीचा प्रतिसाद नाही : आरोग्यमंत्री
- मंत्र्यांना कोर्टात उभं करुन दूध का दूध आणि पाणी का पाणी करु – गुणरत्न सदावर्ते
- मोदी फक्त गुजरातचेच प्रधानमंत्री, अशा संकट काळात पण त्यांना फक्त गुजरातच दिसतोय !
- ‘त्या’ भव्य अंत्ययात्रेला पोलीसच जबाबदार ; दोन अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

