टीम महाराष्ट्र देशा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना लोकसभा निवडणुकीतील पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे. राजू शेट्टी यांच्याविरोधात शिवसेनेचे नवखे उमेदवार धैर्यशील माने यांचं आव्हान होतं. त्यात वंचित बहुजन आघाडीने हाजी अल्लम सय्यद यांना शेट्टींविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होते. आता शेट्टी यांनी सुद्धा कॉंग्रेस राष्ट्र्वादिप्रमाणे वंचित बहुजन आघाडीला लक्ष्य केले आहे.
राजू शेट्टींचा हल्लाबोल
‘बाळासाहेब आंबेडकर यांनी मला सांगीतले होते, मी तुमच्या विरोधात उमेदवार ठेवणार नाही. पण त्यांनी नंतर संपर्क केला नाही. २४ मीस कॉल दिले. ते फार मोठे नेते आहेत. दुस-या एका चळवळीतील नेत्याचा घात व्हायला लागलाय, हे समजत असताना त्यांनी ध्रुतराष्ट्राची भूमीका घेतली’, अशी टीका शेट्टी यांनी आंबेडकर यांच्यावर केली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

