🕒 1 min read
Raju Shetti | मुंबई : महात्मा जोतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेबब आंबेडकर यांनी अनुदान न मागता भीक मागून शाळा सुरु केल्या, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी गेल्या दोन- तीन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड येथे केलं होतं. त्यानंतर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आपल्या वक्तव्यावरून दिलगीरी देखील व्यक्त केली. परंतु, काल पिंपरी-चिंचवड येथे त्यांच्यावर शाई फेकण्यात आली.
शाईफेक करणाऱ्या ( Throwing Lnk) तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. शाईफेक करणाऱ्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे असे गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राजू शेट्टी म्हणाले, “शाईफेकीचे समर्थन करणे चुकीचे आहे, पण शाई फेकणाऱ्या युवकावर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते पाहता सरकार तालिबानींसारखे वागू लागले आहे असे वाटते. ३०७ म्हणजे धारदार शस्त्राने जीवे मारण्याचा प्रयत्न आणि ३५३ म्हणजे सरकारी कामात अडथळा याचा अर्थ महापुरुषांचा अपमान करणे हे सरकारी काम आहे का?”
“मग हा कायदा दिल्लीतील शेतकरी आंदोलनात ज्या सरकारने ७०० हून अधिक शेतकऱ्यांचा बळी घेतला त्याला जबाबदार असणाऱ्यांवर ३०२ सह ही कलमे का लावण्यात आले नाहीत?” असा प्रश्न राजू शेट्टींनी विचारला. पुढे ते म्हणाले, “शाई ही पेनातच धारदार असते दौतामध्ये नाही. असे आम्ही समजत होतो पण दौतातील शाईसुध्दा धारदार शस्र्त्रासारखे काम करते याचा शोध लावल्याबद्दल संबंधित तपास अधिका-याला रेमेन मॅगेसस पुरस्काराने सन्मानित करण्याची गरज आहे.”
महत्वाच्या बातम्या :
- Manoj Garbade | मनोज गरबडे वरील कारवाई बेकादेशीर?; सोशल मीडियावर ‘Release Manoj Garbade’ ट्रेण्डवर
- Uddhav Thackeray | “कर्नाटकचे मुख्यमंत्री मस्तीत बोलतात आणि आपले मुख्यमंत्री…”; सीमाप्रश्नावरून ठाकरेंचा हल्लाबोल
- NCP | “मनोज गरबडे वर अन्याय झाला तर कायदेशीर मदत करणार”; शाईफेक प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
- Jayant Patil | “निर्भया फंडांतून घेतलेल्या पोलीस गाड्यांचा वापर फुटीर आमदारांच्या…”; जयंत पाटलांचा दावा काय?
- Jitendra Awhad | चंद्रकांत पाटील यांच्या विषयी केलेलं ‘ते’ ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केलं डिलीट; चर्चांना उधाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
