कोल्हापूर-दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभर गावोगावी चावड्यांसमोर दुधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांचे तीव्र आंदोलन सुरु झाले आहे. किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीसह महायुतीनेआंदोलनात उडी घेतली आहे.
दरम्यान, दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या दूध बंद आंदोलनाला शनिवारी सकाळी सुरुवात झाली. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी पंढरपुरात संत नामदेव पायरीला विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करुन आंदोलनाची सुरुवात केली. तर शिर्डीच्या पुणतांब्यातही शेतकऱ्यांनी बळीराजाच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत आंदोलन सुरु केले. यावेळी शेतकऱ्यांनी दुधाला भाव मिळालाच, पाहिजे अशी घोषणाबाजीही केली.
एका बाजूला शेतकरी हितासाठी हे आंदोलन सुरु असताना राज्य सरकारच्या बचावासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी धावले आहेत.शेट्टी यांनी आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. भाजपला दुधाचं आंदोलन करण्याचा अधिकार नाही, भाजप काळात दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला होता. केवळ राज्य सरकारविरोधात आंदोलन असेल तर ही शुद्ध दूध उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.
‘भाजपचे आजचे आंदोलन हे पुतणा मावशीचे प्रेम आहे. कारण, ठोस उपाय योजना करण्याचे काम हे केंद्र सरकारचे आहे. केंद्राने आयात थांबवली पाहिजे, निर्यातीला सबसिडी दिली पाहिजे आणि जीएसटी मागे घेतला तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल’ असं म्हणत राजू शेट्टींनी भाजपवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –
महसूल दिनापासून डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारा होणार उपलब्ध
अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळायलाच हवा… जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
“हा” पठ्ठया सगळ्या विषयात ३५ मार्क मिळवत झालाय थाटात पास!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

