Share

महसूल दिनापासून डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारा होणार उपलब्ध

Published On: 

पुणे – महसूल विभागाच्या महाभूमी प्रकल्पा अंतर्गत ई फेरफार कार्यक्रमा अंतर्गत डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारा (गाव नमुना नं.८ अ ) आत्ता ही आणखी एक नवीन सुविधा  १ ऑगस्ट पासून सुरु केली जात आहे. त्याचा शुभारंभ  बाळासाहेब थोरात महसूल मंत्री यांचे शुभ हस्ते महसूल दिनी ऑनलाईन पद्धतीने होत आहेत.

महाभूमी पोर्टल वर संगणकीकृत अभिलेखापैकी फक्त सातबारा डिजिटल स्वाक्षरीने जनतेला डाऊनलोड साठी उपलब्ध होता आत्ता त्यासोबतच डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारा देखील मिळणार आहे. कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, पीक कर्ज किंवा जमीन खरेदी विक्रीसाठी सातबारा सोबतच खाते उतारा देखील आवश्यक असतो त्यामुळे महसूल विभागाने ख्स्ते उतारा देखील तलाठी यांचे डिजिटल स्वाक्षरीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे

महसूल विभाग दरवर्षी १ ऑगस्ट हा महसूल दिन उत्साहाने साजरा करतो परंतु यावर्षी कोरोना च्या प्रादुर्भावामुळे महसूल दिन साध्या पद्धतीने व सर्व निर्बंध पाळून साजरा करण्याचे निर्देश अप्पर मुख्य सचिव महसूल डॉ. नितीन करीर यांनी दिले आहेत त्यामुळे हा शुभारंभ देखील ऑनलाईन पद्धतीने होत आहे.

यावेळी महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तर , अप्पर मुख्य सचिव महसूल डॉ. नितीन करीर, जमाबंदी आयुक्त श्री. चोक्कलिंगम, सह सचिव महसूल  संतोष भोगले व राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र पुणे येथील तंत्रज्ञ , सर्व विभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी व ई फेरफार प्रकल्पाचे जिल्ह्याचे समन्वयक उप जिल्हाधिकारी ऑनलाईन पद्धतीने सहभागी होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय लांबणीवर; १० ऑगस्ट रोजी होणार सुनावणी

‘भाजपच्या नेत्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, चार महिन्यांपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!