नाशिक : गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचारी संपावर अखेर तोडगा निघाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याची घोषणा परिवहन मंत्रि अनिल परब (Anil Parab) यांनी केली आहे. तसंच संप मागे घेत कामावर हजर होण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. मात्र, एसटी कर्मचारी (ST Employees) विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असून त्यांनी संप सुरुच ठेवण्याचा निर्धार केला आहे.
राज्य सरकारने काही मागण्या मान्य केल्यानंतर आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आंदोलनातून तात्पुरती माघार घेत असल्याचे सांगितले आहे. यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सदाभाऊ खोत यांना खोचक टोला लगावला आहे.
एसटीचे आंदोलन आणि शेतकरी आंदोलन वेगळे असते. याचा गृहपाठ न केल्याने त्यांना तोंडघशी पडावे लागले. ज्यांचे नेतृत्व करतो त्यांच्या अपेक्षा वाढतात. चळवळ म्हणजे एक प्रकारचा वाघ आहे. वाघावर स्वार होणं सोपं असतं. पण एकदा स्वार होऊन परत पायउतार होणं अवघड. अन्यथा वाघ स्वार होणाऱ्यालाच खाऊन टाकतो, अशा शब्दात शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सुशांतची हत्या होऊनही मुख्यमंत्र्याच्या मुलाला…’
- शाळेची घंटा वाजणार: 1 डिसेंबरपासून पहिली ते बारावीपर्यंत सर्व शाळा सुरू
- औरंगाबादेत आजपासून रात्री ७ नंतर पेट्रोलपंप राहणार बंद; जिल्हाधिकार्यांविरोधात पेट्रोल पंप चालकांचा निर्णय!
- शिवसेनेच्या आमदाराच्या कार्यालयावर नगरपालिकेचा बुलडोझर
- जिन्सीत जागा खरेदी करतांना बाजार समितीने डावलले नियम; माजी सभापती राधाकिसन पठाडेंचा आरोप!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

