🕒 1 min read
औरंगाबाद : जिल्हाधिका-यांनी काढलेल्या नो लस नो पेट्रोल या आदेशाची अंमलबजावणी करताना पेट्रोलपंपचालकांना कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवू लागल्याने गुरुवारपासून (दि. २५) सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंतच पंप सुरू ठेवण्याचा निर्णय पेट्रोल डिलर्स असोसिएशनने घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंप चालकांसोबत केलेल्या सक्तीमुळेच त्यांनी हा निर्णय घेतला असावा असे बोलले जात आहे.
पेट्रोल असोसिएशनने जिल्हाभरासाठी हा निर्णय घेतल्याने, इतर जिल्हा व परराज्यातून आलेल्या वाहनधारकांचे लस येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना रात्री पेट्रोल-डिझेल न मिळाल्याने अडचणींचा सामाना करावा लागण्याची शक्यता आहे. पंपावर इंधन भरण्यासाठी प्रमाणपत्र तपासणे, त्यांना एक पावती देऊन इंधन भरण्यासाठी सोडणे, लस न घेतलेल्यांना जवळील लसीकरण केंद्राबाबतची माहिती देऊन जनजागृती करणे, आदी कामांसाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करावे लागत आहे.
मॅनपॉवरचा प्रश्न उद्भवल्याने २५ नोव्हेंबरपासून सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंतच पंप सुरू ठेवण्यात येईल. सायंकाळी ७ नंतर पेट्रोल-डिझेल विक्री बंद राहील, ७ असा निर्णय पेट्रोल डिलर्स असोसिएशनने बुधवारी (दि. २४) घेतला आहे. नागरिकांनी पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी पंपावर येताना लस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे, तसेच कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने जारी केलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास (Akhil abbas) यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेच्या आमदाराच्या कार्यालयावर नगरपालिकेचा बुलडोझर
- जिन्सीत जागा खरेदी करतांना बाजार समितीने डावलले नियम; माजी सभापती राधाकिसन पठाडेंचा आरोप!
- बिचुकले कोरोना पॉझिटिव्ह ‘बिग बॉस’ मधून बाहेर?
- एसटी कर्मचारी संपावर ठाम; अधिकाऱ्यांना पेढे वाटून गांधीगिरी मार्गाने विरोध!
- रेल्वे प्रश्नाबाबत प्रशासन उदासिन; शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी व्यक्त केली नाराजी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
