Share

शाळेची घंटा वाजणार: 1 डिसेंबरपासून पहिली ते बारावीपर्यंत सर्व शाळा सुरू

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना काळात सर्व शाळा महिविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. कोरोनाची लाट ओसरताच शाळा सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र काहीच वर्ग सुरु करण्यात आले होते. पहिली ते पाचवीपर्यंत शाळा सुरू कराव्यात की नाहीत, याबाबत अनेकांचे दुमत होते. पण अखेर ठाकरेंच्या मंत्रिमंडळाने पहिली ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. पण शाळा सुरू करत असतानाही विद्यार्थ्यांना कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे.

कोरोना नियमांचे पालन करणे ही जबाबदारी ही शिक्षकांवर अधिक असणार आहे. राज्याच्या शिक्षण विभागाकडून पहिलीपासून बारावीपर्यंत सर्व वर्ग सुरू करण्यास मंजुरी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी पत्रकार परिषद घेऊन शाळा सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यावेळी त्यांनी शाळा सुरु होण्याबाबत भाष्य केले आहे.

ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात महानगरपालिका क्षेत्रातील ८ वी ते 12 वीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात मागील काळात निर्णय घेतला होता. त्यानुसार त्या शाळा सुरू झाल्या होत्या. ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवी या शाळा सुरू करण्यासंदर्भात आम्ही आरोग्य विभागाचा अभिप्राय घेतला होता, मुख्य सचिवांचा अभिप्राय घेतला होता. तसेच टास्क फोर्सशीसुद्धा चर्चा केली होती. त्या प्रमाणे ती फाईल मुख्यमंत्र्यांना पाठवली होती. आजच्या मंत्रिमंडळातील बैठकीत मुख्यंमत्री उद्धव ठाकरे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

पहिली ते सातवी या शाळा एक डिसेंबरपासून सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला असून ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागातील पहिली ते सातवी या शाळा एक डिसेंबरपासून सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी लागणारी तयारी या काळात आम्हाला करता येईल. यापुढे महाराष्ट्रात पहिलीपासून ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू होतील. अशा पद्धतीचा निर्णय घेतला गेलेला आहे. दोन वर्षांनंतर सर्व शाळा सुरू करण्यात येत असून, त्यासंदर्भातली सर्व काळजी आम्ही घेणार आहोत, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!