Share

पोलिसांनी बळाचा वापर केला, तर सहन करणार नाही – राजू शेट्टी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामधे प्रति लिटर पाच रुपये अनुदान जमा करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून राज्यव्यापी आंदोलन करणार आहे.

दरम्यान, या आंदोलनातून मुंबईला होणारा दूध पुरवठा रोखण्याचा स्वाभिमानीचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे रविवारी मध्यरात्रीपासून मुंबईची दूधकोंडी होण्याची शक्यता आहे. तसेच, पोलिसांनी बळाचा वापर करुन हे आंदोलन मोडीत काढण्याच प्रयत्न केला, तर सहन करणार नाही, असं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केल आहे.

राजू शेट्टी रविवारी संध्याकाळी पंढरपूरमधे असणार आहेत. तिथून रात्रीचा प्रवास करुन ते पालघर जिल्ह्यातील गुजरातच्या सीमेवर पोहचणार आहेत. तिथे राजू शेट्टी स्वत: आंदोलनात सहभागी होतील असं सांगण्यात आलं आहे. पाच रुपयांच्या अनुदानाची ही मागणी गाईच्या दुधासाठी असुन दररोज अतिरिक्त ठरणारं चाळीस लाख लिटर गाईच दुध सराकरने सत्तावीस रुपये प्रति लिटर दराने खरेदी करण्याची मागणीही स्वाभिमानीकडून करण्यात आली आहे.

…तर गाठ आमच्याशी आहे ; राजू शेट्टींचा दूध संघांना इशारा

दूध खरेदीसाठी नवे धोरण- महादेव जानकर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!