Share

दूध खरेदीसाठी नवे धोरण- महादेव जानकर

Published On: 

मुंबई, दि. 7-  राज्यातील दूध, दूध पावडर आणि बटर निर्मिती संदर्भातील अडचणी दूर व्हाव्यात आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी दूधाच्या खरेदीचे नवे धोरण राज्य शासन आणणार असल्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.
श्री. जानकर पुढे म्हणाले, राज्यात एक कोटी 34 लाख लिटर दूध निर्मिती होत असते यावर्षी सुमारे 20 लाख लिटर दूध अतिरिक्त झाले आहे. शासनाने 7 रुपये प्रतिलिटर ने दूध खरेदी केली आहे. जागतिक स्तरावर दुधाच्या भुकटीच्या किंमती कमी झाल्यामुळे दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत दूरगामी धोरण बनविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उपरोक्त संदर्भातील लक्षवेधी सदस्य रामहरी रुपनवार यांनी उपस्थित केली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!