मुंबई : घराणेशाहीवरून नेहमीच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. भाजपाकडून घराणेशाहीच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमी लक्ष्य केलं जातं. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी भाजपातील घराणेशहीवर टीका केली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची राजकारणातील वंशावळ ट्विट करत भाजपवर त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
याबाबत रुपाली पाटील ठोंबरे ट्विट करत म्हणाल्या, ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. घराणेशाहीला विरोध करता करता भाजपात कधी घरणेशाही घुसली भाजपाला समजलच नाही? घराणेशाही च्या विरोधात लढणारी पार्टी म्हणे. पार्टी विथ डिफरेन्स.’, असे ट्विट रुपाली पाटील ठोंबरे यांनी करत भाजपवर निशाणा साधला आहे.
लोका सांगे ब्रम्हज्ञान
स्वतः कोरडे पाषाणघराणेशाहीला विरोध करता करता भाजपात कधी #घरणेशाही घुसली भाजपाला समजलच नाही?#घराणेशाही च्या विरोधात लढणारी पार्टी म्हणे
पार्टी विथ डिफरेन्स pic.twitter.com/bRW1bdMppI— Rupali patil thombare (@Rupalispeak) January 17, 2022
रुपाली पाटील ठोंबरे यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नात्यातील तीघांचे फोटो आणि त्यांचे राजकारणातील पदाचा उल्लेख केला आहे. या तीनही उमेदवारांना भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत तीकिट दिले आहे. त्यात राजनाथ सिंग यांचे चिरंजीव, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांचे नातू, खासदार हुकूम सिंग यांची कन्या यांचे फोटो ट्विट केले आहेत. आणि तरीही भाजपमध्ये घराणेशाही नाही बरं का. असा खोचक टोलाही रुपाली पाटील यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
“भाजप राजकीय फायद्यासाठी जातीय चौकटीत बांधू पाहतेय”, संजय राऊतांची टीका
“भाजप पुढाऱ्यांना दलितांच्या घरी जेवल्याचा बोभाटा करावा लागतो, याचाच अर्थ त्यांच्या मनात ‘जात’ आहे”
जितेंद्र आव्हाडांनी घेतली किरण मानेंची बाजू म्हणाले, “वागणुकीमुळे नाही तर…”
‘ही शिवसेना नव्हे, ही तर काँग्रेस सेना’; रवी राणांचा शिवसेनेवर हल्ला
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी परवानगी कशाला हवी? नवनीत राणांचा हल्लाबोल


