🕒 1 min read
महाराष्ट्र देशा डेस्क : “काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल, सगळं ओक्केमध्ये” या डायलॉगने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना या एका डायलॉगने प्रत्येक घराघरात हास्य निर्माण केले. सांगोल्याचे आमदार शाहाजी बापू पाटील यांच्या कॉल रेकॉर्डिंगमधून हे वाक्य ऐकायला मिळाले आणि दिवसभरातच हजारो मिम्समधून व्हायरल झाले. या डायलॉगने चित्रपट सृष्टीलाही भुरळ घातली आहे. त्यामुळे झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध शो ‘चला हवा येऊ द्या’ च्या येत्या भागात शाहाजी बापू पाटील हे त्यांच्या पत्नी रेखा पाटील यांच्यासह उपस्थित राहणार आहेत
https://www.instagram.com/tv/Cf_Pa_ut1qp/?utm_source=ig_web_copy_link
‘चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर शाहाजी बापू येण्यार म्हणल्यावर प्रेक्षकांना हास्याची पर्वणीच मिळणार आहे, यात शंकाच नाही. झी मराठीच्या ऑफिशिअल अकाऊंटवरून शाहाजी बापू पाटलांचा एक व्हिडीओ शेयर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सुद्धा सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओ ‘चला हवा येऊ द्या चे कलाकार एक कॉमेडी गाणं म्हणताना दिसत आहेत. थुकरटवाडीत सादर होणाऱ्या प्रत्येक स्कीटमुळे प्रेक्षक पोट धरून हसतात. तसेच या भागाच्या प्रोमोमध्ये शाहाजी बापू देखील मनसोक्त हसताना दिसत आहेत. या भागाच मुख्य आकर्षण असणार आहे शाहाजी बापूंच्या तोंडून ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, सगळं ओक्केमध्ये’ हा भन्नाट डायलॉग ऐकणे. हा भाग येत्या सोमवार आणि मंगळवारी प्रदर्शित होणार आहे. या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- Devendra Fadnavis’ Aukshana : राज ठाकरेंच्या पत्नींने केले देवेंद्र फडणवीस यांचे औक्षण
- Delhi : दिल्ली पुन्हा हादरली! धावत्या कारमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; घटनेचा बनवला VIDEO
- Sanjay Raut : “चिठ्या देतात, माईक खेचतात…” ; संजय राऊतांची शिंदे सरकार टीका
- Mumbai Cricket : ज्या मैदानावर विश्वचषक विजेत्या खेळाडूंनी गिरवले क्रिकेटचे धडे, त्याला लागले कुलूप; वाचा!
- Sanjay Raut | मी शिवसेनेचा मालक आहे का?- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
