मुंबई: मोदी सरकारने खेलरत्न पुरस्कारातील राजीव गांधी यांचे नाव वगळून मेजर ध्यानचंद यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. आता याच पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांना राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खेलरत्नमधून नाव वगळल्याने काँग्रेसची भाजपवर ही कुरघोडी केल्याचे बोलले जात आहे.
भारतात माहिती विकास तंत्रज्ञानात राजीव गांधी यांनी महत्वाचे बदल केले. यामध्ये त्यांची भूमिका अग्रगण्य राहिली. त्यांच्या तंत्रज्ञान विकासातील योगदानाबद्दल त्यांच्या स्मरणार्थ माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन म्हणून राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येणार आहे.
या वर्षी राजीव गांधी यांच्या २० ऑगस्ट जयंतीरोजी पुरस्काराची घोषणा केली जाईल. तर ३१ ऑक्टोबरपूर्वी पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. त्यानुसार पुढील वर्षीपासून दरवर्षी २० ऑगस्टला हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. आतापर्यंत राजीव गांधी यांची जयंती ‘माहिती तंत्रज्ञान दिन’ म्हणून साजरी केली जात होती. यापुढे त्यांच्या नावाने पुरस्कार दिला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी मोईन अलीचे संघात पुनरागमन
- महाराष्ट्रात आज ५,६०९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर…
- ‘अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी समिती गठित करणार’- वर्षा गायकवाड
- ‘MPSC आयोगामध्ये ठराविक एका जातीच्याच लोकांची नियुक्ती’; प्रीतम मुंडे लोकसभेत कडाडल्या
- ठरलं ! 17 ऑगस्टपासून राज्यातील ‘या’ इयत्तेचे वर्ग भरणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

