Share

देर आये दुरुस्त आये; रेमडेसीवीर निर्यातबंदीवरून टोपेंचा केंद्राला टोला

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रासह देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच, येत्या काळात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत टास्क फोर्सची बैठक पार पडली आहे. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील उपस्थित होते. लॉकडाऊनबाबत काय निर्णय होणार ? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असून टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी १४ दिवसाच्या लॉकडाऊनची गरज असल्याचे मत वर्तवले आहे. दरम्यान, ही बैठक संपली असून उद्धव ठाकरेंनी तज्ज्ञांची मतं जाणून घेऊन काही शंकांचे निरसन देखील करून घेतले आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी या बैठकीनंतर दिली आहे.

यासोबतच, राज्यातील आरोग्य सुविधा कमी पडत असून याबाबत देखील महत्वाची चर्चा झाली आहे. ऑक्सिजन, रेमडीसीवीर यांच्या पुरवठ्याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, केंद्र सरकारने रेमडेसीवीरची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे राजेश टोपे यांनी स्वागत केलं असून, ‘आम्ही ही मागणी आधीच केली होती. मात्र देर आये दुरुस्त आये ! केंद्राच्या या निर्णयाचे स्वागत,’ असा टोला देखील लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!