मुंबई : देशात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वांसाठी देखील लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. अशातच अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण होत असून आता सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी लसींचे नवे दर जाहीर केले आहेत. आधीच आर्थिक पेचात असलेले नागरिक नव्या किंमतींमुळे अधिक पेचात पडले असून लसीकरणामध्ये मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो.
अनेक राज्यांनी लसींच्या वाढलेल्या किंमतीवर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर, केंद्र सरकारने या कंपन्यांना लसींच्या किंमती कमी करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, या मागणीला त्वरित प्रतिसाद देऊन सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावाला यांनी राज्यांसाठी कोव्हीशील्ड या लसीची किंमत ४०० रुपयांवरून ३०० रुपये प्रति डोस अशी केल्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे मोफत लसीकरण केले जाणार आहे. राज्य सरकार कोव्हीशील्डच्या सर्वाधिक लस विकत घेणार आहे. कोव्हीशील्डने महिन्याला १ कोटी लसींचा पुरवठा करण्यास समर्थता दर्शवल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांना दिली आहे. त्यामुळे प्रति डोस १०० रुपये कमी आकारण्यास येणार असल्याने राज्य सरकारच्या तिजोरीतील कोट्यवधी रुपयांची बचत होणार आहे.
अन्य उत्पादक कंपन्यांनी देखील पुढाकार घेऊन नागरिकांच्या व्यापक हिताचा असा हा निर्णय घ्यावा.
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 28, 2021
यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे पूनावालांचे आभार व्यक्त करत इतर लस निर्मात्या कंपन्यांनी देखील पुढाकार घ्यावा असं आवाहन केलं आहे. ‘सिरम इन्स्टिट्यूटने राज्याला पुरविण्यात येणाऱ्या कोविशिल्ड लसीची किंमत 100 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. कोरोना महामारीपासून नागरिकांच्या बचावासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना यामुळे बळ मिळणार आहे. अन्य उत्पादक कंपन्यांनी देखील पुढाकार घेऊन नागरिकांच्या व्यापक हिताचा असा हा निर्णय घ्यावा.’ असं राजेश टोपे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- योगी ‘राज’! आजोबांना ऑक्सिजनची गरज असल्याचे ट्विट केल्याबद्दल युवकावर गुन्हा
- ‘आगार व्यवस्थापकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’
- ‘महात्मा फुले योजनेतंर्गत मोफत कोरोना उपचार देणे ही राज्याची जबाबदारी’, हायकोर्टाचे आदेश
- ‘बारामतीकरांकडून उजनीचे पाणी चोरण्याचा घाट’, खा.निंबाळकरांचा आरोप
- चक्क पोलीस अधिक्षकांच्या नावाने बनावट फेसबुक खाते, मेसेजमधून मागितले पैसे!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

