Share

दूरदर्शनचा चेहरा काळाच्या पडद्याआड! वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन

Published On: 

मुंबई : वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. दूरदर्शनचा चेहरा म्हणून त्यांची ओळख होती. बातम्या सांगण्याची खास शैली आणि भारदस्त आवाजामुळे प्रदीप भिडे हे दूरदर्शनच्या बातमीपत्राचा चेहरा बनले होते. प्रदीप भिडे यांच्यावर आज अंधेरी पूर्व येथील पारशीवाडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनानंतर माध्यमविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.

दूरदर्शन केंद्र मुंबईचे उद्घाटन 2 ऑक्टोबर 1972 रोजी झाले. प्रदीप भिडे 1974 पासून वृत्तविभागामध्ये अनुवादक म्हणून दूरदर्शनमध्ये दाखल झाले. अभिनेत्री स्मिता पाटील, भक्ती बर्वे, ज्योत्सना किरपेकर हे सगळे त्यांचे सम व्यावसायिक होते. वयाच्या 21 व्या वर्षी भिडे यांनी बातम्या द्यायला सुरुवात केली.

प्रदीप भिडे यांना सुरुवातीपासूनच मराठी वाड्.मय, नाटके, कादंब-या, एकांकिका या विषयांमध्ये विशेष रुची होती. प्रसार माध्यमात करिअर सुरू करावं असा पहिल्यापासून त्यांचा मानस होता.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!