🕒 1 min read
मुंबई : भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. हे मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत द्रविडने संघातील अनेक महत्त्वाच्या खेळाडूंबद्दल माहिती दिली व वेगवेगळ्या पैलूंवर चर्चा केली.
दिल्लीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला टी-२० सामना भारताने जिंकला तर हा भारताचा सलग १३वा विजय असेल. याबाबत द्रविड म्हणाला की, ‘मी या विक्रमाचा फारसा विचार करत नाही. आपण चांगले खेळलो तर जिंकू, पण चांगले खेळलो नाही तर शिकू. त्याचवेळी, त्यांनी संघातील दिनेश कार्तिकच्या भूमिकेबद्दलही खुलासा केला.
दिनेश कार्तिकने आयपीएल २०२२ मध्ये चांगली कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या भारतीय टी-२० संघात स्थान मिळवले आहे. द्रविडने कार्तिकबद्दल सांगितले की, “तो ज्या प्रकारे आयपीएलमध्ये त्याच्या संघासाठी फिनिशरची भूमिका बजावत होता. तीच भूमिका त्याला भारतासाठी निभावायची आहे आणि हे पूर्णपणे स्पष्ट आहे. फिनिशरची भूमिका बजावण्यासाठीच त्याची संघात निवड करण्यात आली आहे.”
M. O. O. D in the camp ahead of the #INDvSA T20I series. ☺️ ????#TeamIndia | @Paytm pic.twitter.com/ZMB1XEvU7I
— BCCI (@BCCI) June 7, 2022
द्रविडने टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्माबद्दल सांगितले की, “तो सर्व फॉरमॅटचा खेळाडू आहे आणि प्रत्येक सामन्यासाठी प्रत्येकजण उपलब्ध असेल अशी अपेक्षा तुम्ही करू शकत नाही. रोहित पूर्णपणे तंदुरुस्त आणि फ्रेश असावा अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे ही अशी वेळ आहे जेव्हा आम्ही आमच्या मुख्य खेळाडूंना विश्रांती देतो.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
