मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाची सगळीकडे बरीच चर्चा होती. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता सोनू सूदने देखील महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये सोनू सूद हा चांद बरदाईच्या भूमिकेत आहे. बॉक्स ऑफिसवरील अपयश पहाता सोनू सूदने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
एका मुलाखतीमध्ये सोनू सूद ला चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील अपयशाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सोनू सूद म्हणाला की, “हा चित्रपट खास असा आहे. मला यात भूमिका साकारण्याची संधी मिळाली. लोकांनीही खूप प्रेम दिलं. मी माझ्या प्रेक्षकांचे या प्रेमासाठी आभार मानतो.” “चित्रपटाला कदाचित अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही. मात्र आम्हाला हे मान्य करायची गरज आहे की कोरोनाच्या साथीनंतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. मला विचाराल तर लोकांनी जे प्रेम दिलं त्याबद्दल मी खूप आनंदी आहे.”
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी १०.७० कोटी रुपयांची कमाई केली होती. नंतर शनिवारी १२.६० कोटी आणि रविवारी १६.१० कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने ३९.४० कोटींची कमाई केली. आता पुढच्या काही दिवसात किती कमाई करते हे पहावं लागेल. अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’च्या तुलनेत कार्तिक आर्यनची ‘भूल भुलैय्या २’ चित्रपटाची कमाई चांगली होत आहे.
महत्वाच्या बातम्या :


