Rajendra Janjala | औरंगाबाद : राज्यात सध्या अनेक मोठ्या राजकीय घडामोडी सातत्याने घडत आहेत. काल शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी आपल्या नेतेपदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून राजीनामा दिला. कदम यांच्या राजीनाम्यानंतर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज माझ्या पराभवाला नेते रामदासजी कदम जवाबदार असल्याचे म्हंटले. तर खैरेंच्या या वक्तव्यानंतर कुस्तीच्या आखाड्यात समोरच्या पहिलवानाने लंगोटच काढून घेतल्यानंतर आपली लाज झाकावी कि कुस्ती लढावी अशीच तुमची अवस्था झाली आहे, अशी टीका औरंगाबादचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी खैरेंवर केली आहे.
जंजाळ यांनी फेसबुक पोस्ट करत म्हंटल कि, आपणास विसर पडला असेल रामदासभाई पालकमंत्री असताना नियोजन समितीवर राजेंद्र जंजाळ ,त्रिंबक तुपें,बाळासाहेब थोरात याची नियुक्ती केली होती. आणि एका विशिष्ट समाजाच्याच लोकांची नियुक्ती झाली (ज्या समाजाच्या प्रती आपल्या मनामध्ये राग आहे) असे सांगत आपण थयथयाट केला आणि संभाजीनगर पालकमंत्री पदावरून त्यांना नांदेड ला पाठवण्यात आले. त्यानंतर अनेक महिन्यांनी आपली लोकसभा निवडणूक झाली. आपण किती कोटी रुपये देऊन MIM उमेदवाराला उभे केले हे सगळ्यांनाच माहिती आहे, असंही ते म्हणाले.
तिथेच तुमची शेखचिल्ली सारखी अवस्था झाली. निवडणुकी दरम्यान आम्ही वेळोवेळी तुम्हाला फितुरीची माहिती दिली पण तुमचा आत्मविश्वास MIM च्या उमेदवाराला उभे केल्यामुळे कमालीचा वाढलेला होता. तुम्ही हर्षवर्धन जाधव ला आपला प्रतिस्पर्धी समजत होतात आणि ज्याला तुम्ही पैसे देऊन उभे केले त्यांनीच तुमचा लंगोट काढला. स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी म्हणणारे तुम्ही MIM च्या मदत का घेतली.
या शहरावरील भगवा खाली उतरवण्यात तुमची धनशक्ती जवाबदार ठरली याची आम्हाला खंत आहे.आणि तुमच्या निवडणुकीत आम्ही रक्ताचं पाणी करून काम केलं रात्र रात्र जागलो लोकांना अंगावर घेतलं तेव्हा तुमचे सुपूत्र पबजी खेळण्यात आणि पार्ट्या करण्यात मश्गुल होते. अजूनही तुमच्या पराभवाचे शिलेदार तुम्ही शोधा कोणावरही आरोप कारण सोडा. नाही तरी तुमची अवस्था अहो खैरे आता तरी व्हा बरे अशी झालीच आहे, असं शेवटी ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Kishori Pednekar | “जायचं असेल तर सरळ जा परंतु…” ; रामदास कदमांच्या आरोपानंतर किशोरी पेडणेकर आक्रमक!
- Eknath Shinde : 12 खासदारांच्या समर्थनाचं पत्र लोकसभा अध्यक्षांकडे दिल्यानंतर शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- Imtiaz Jalil : गुगलने संभाजीनगर उल्लेख केल्याने इम्तियाज जलील संतापले, थेट गुगललाच विचारला जाब
- uday samant : एकनाथ शिंदे दिल्लीला गेले मात्र सगळं लक्ष महाराष्ट्रात – उदय सामंत
- Udayanraje Bhosale । “संजय राऊत भगवान है…”; उदयनराजे संतापले


