🕒 1 min read
Eknath Shinde । नवी दिल्ली : आज (मंगळवार) लोकसभेतील शिवसेनेच्या १९ पैकी किमान १२ खासदार स्वतंत्र गट तयार करण्याची शक्यता आहे. या संदर्भात खासदार सभापतींना औपचारिक पत्र सादर करतील. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (शिवसेना) हा मोठा झटका मानल्या जात आहे. यापूर्वी या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. शिवसेनेच्या १२ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. तसा फोटो समोर आला आहे.
एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर लागलीच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन गटनेता बदलण्याची मागणी केली आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचा विश्वासही या खासदारांनी व्यक्त केला आहे. स्वतंत्र गटासंदर्भात देखील लवकरच निर्णय घेण्याची मागणी देखील लवकरच होईल असा त्यांना विश्वास आहे. यासंदर्भात 12 खासदारांनी पत्र लोकसभा अध्यक्षांना एक पत्र दिले आहे.
याबाबत मुख्यमंत्र्यांनी देखील माहिती दिली आहे. ते म्हणाले कि, आता शिवसेनेच्या बारा खासदारांनी आज लोकसभा अध्यक्षांकडे पत्र दिले आहे. शिवसेना लोकसभा गट तयार करून 12 लोकांचे पत्र दिले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ते नवी दिल्लीत बोलत होते. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते, मुख्यप्रतोद भावना गवळी इतर आमदार उपस्थित होते.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले कि, दिल्लीला येण्याची दोन कारणे होती, एक तर खासदारांच्या समर्थनाचे पत्र आणि दुसरे म्हणजे ओबीसी आरक्षणासंबंधी वकिलांची भेट असल्याचे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तसेच महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या विचाराची भूमिका, आनंद दिघे यांचे विचार हे घेऊन आम्ही महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन केले. लोकांच्या मनातील सरकार स्थापन केले. त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Imtiaz Jalil : गुगलने संभाजीनगर उल्लेख केल्याने इम्तियाज जलील संतापले, थेट गुगललाच विचारला जाब
- uday samant : एकनाथ शिंदे दिल्लीला गेले मात्र सगळं लक्ष महाराष्ट्रात – उदय सामंत
- Udayanraje Bhosale । “संजय राऊत भगवान है…”; उदयनराजे संतापले
- Lok Sabha : शिंदे गटात सामील झालेल्या 12 खासदारांची पुढची रणनिती, लोकसभा अध्यक्षांकडे केल्या तीन मागण्या
- Om Birla : शिंदे गटात सहभागी झालेल्या १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
