Share

राजस्थानच्या साकारियाला अनन्या सोबत डेटवर जाण्याची इच्छा !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज चेतन साकारियाने बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज चेतन साकारियाने सोमवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यासह डेब्यू सामना खेळला होता. साकारियाचे पहिल्या सामन्याततील गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण पाहून सगळेच जण प्रभावित झाले होते. साकारियाने त्याच्या चार षटकांत 31 धावा केल्या आणि तीन गडी बाद केले.

याशिवाय त्याने निकोलस पुराणचा मोठा झेल पकडला, ज्याचा डोळ्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. येथे पोहोचण्याचा प्रवास साकारियासाठी खूप कठीण होता. यंदा राजस्थान रॉयल्सने साकारियाला 1.20 कोटी रुपयांना विकत घेतले.

राजस्थान रॉयल्स फ्रँचाइजीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यात टीमचा वेगवाग गोलंदाज आकाश सिंह आणि चेतन सकारिया आनंदाच्या मूडमध्ये एक दुसऱ्याची मुलाखत घेताना दिसत आहेत. चेतन या व्हिडिओत म्हणतो की युवराज सिंह माझा आदर्श आहे.

आकाश सिंहने चेतनला, ‘तुला कोणत्या बॉलिवूड अभिनेत्री सोबत डेटवर जायला आवडेल’ असे विचारले असता चेतनने अनन्या पांडेचे नाव घेतले. अनन्या खूप सुंदर आहे आणि तिच्यासोबत कोणत्यातरी बीचवर कॉफीचा आस्वाद घ्यावसा वाटतो, अशी इच्छा चेतनने यावेळी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!