Share

“रोहित पवारची लायकी नाही, त्याला शेंबूड काढायचा कळतो का?” पडळकरांचा जोरदार पलटवार

Published On: 

मुंबई :  भाजपाचे विधानपरिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर हे मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका करत असल्याचे दिसून येत आहे. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जातीयवादी आणि बहुजन लोकांच्या विरोधी असल्याचा आरोप देखील गोपीचंद पडळकरांनी केला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकरांवर टीका केली होती. भाजपामधील वरीष्ठ नेत्यांनी गोपीचंद पडळकरांना आवरायला हवं, असं रोहित पवार म्हणाले होते. रोहित पवार यांच्या या टिकेला आता पडलकरांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पडळकरांनी प्रत्युत्तर देताने म्हटले, “राज्यात नेमकं मोठं कोण? रोहित पवारांना हा प्रश्न विचारला पाहिजे. तुमच्या घरातल्या कुणालाच मी मोठं मानत नाही. आधी आजोबा आणि नातवानं हे ठरवलं पाहिजे. आमच्या महापुरुषांचा इतिहास तुम्ही पुसायला निघाले आहात. त्याचं उत्तर तुम्ही राज्यातल्या जनतेला दिलं पाहिजे. आजोबांनी जेजुरीत भाषणात काय म्हटलं? जिथे रोहित पवार नेतृत्व करत आहेत, तिथे अहिल्यादेवींचा जन्म झाला. म्हणजे तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठे झाले का?” असा सवाल पडळकरांनी केला आहे.

“चौंडीचा कार्यक्रम तुम्ही घ्यायची गरजच नव्हती. तिथे तुम्ही उघडे पडलात. त्या कार्यक्रमात शरद पवार म्हणतायत की, अहिल्यादेवींच्या पावलावर पाऊल ठेऊन रोहित पवार काम करतोय. रोहितला अजून शेंबुड काढायचा कळतो का? तुम्ही अहिल्यादेवींसोबत तुलना करायला चालले आहात. त्यामुळे मला आवरायचं सोडा. गेल्या ७० वर्षांत तुम्हाला आवरायला कुणी नव्हतं. तुम्हाला आवरायचं काम मी करतोय. तुम्ही आता पूर्णपणे उघडे पडले आहात”, अशा शब्दांत पडळकरांनी टिव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना टीका केली आहे.

“रोहित पवारांची अजून लायकी नाहीये. आजोबांनी त्यांना सादर करायचं, अहिल्यादेवींचा कार्यक्रम हायजॅक करायचा इतक्या लेव्हलचे, लायकीचे तुम्ही नाही. आता हे लोकांना कळालं आहे. चौंडीतला कार्यक्रम आटोपता का घ्यावा लागला? रोहित पवारांनी कार्यक्रम घ्यायचा काही संबंध नाही. तुमच्या आजोबांना ८२ वर्ष झाली, तुम्हाला कधी अहिल्यादेवींची जयंती दिसली नाही. तुम्ही कार्यक्रम घेताय, मग आम्ही काय मेलोय का?” असा सवाल देखील पडळकरांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!