🕒 1 min read
औरंगाबाद:- वाहतूक कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी एक कारचालक व त्याचा सहकारी इतर वाहनचालकांना चक्क पिस्तुलाचा धाक दाखवत असल्याचं समोर आलं आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर हा प्रकार घडला असून याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. पिस्तूलबाज वाहनचालकाच्या गाडीवर शिवसेनेचा लोगो असल्यानं उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. शुक्रवारी रात्री हा प्रकार घडल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, पिस्तूल दाखवून ओव्हरटेक करणाऱ्या कथित शिवसैनिकांवर भाजपनेही हल्लाबोल सुरु केला आहे.
दरम्यान, सध्या राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं सरकार आहे. आम्ही शिवसैनिक आहोत. हवेत फिरवलेला पिस्तूल हा गाडीत बसलेल्या व्हीआयपी लोकांचा असेल, पिस्तूल दाखवून कोणीही दहशत पसरवत नाही, असे वक्तव्य माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे. ते औरंगबादमध्ये टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.
तसेच, औरंगाबादचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे चुकून निवडून आलेले आहेत. आता लोकांना पश्चात्ताप होत आहे. तसेच, जलील यांच्या घराच्या बाजूलाच गोळ्या झाडल्या जातात असेही खैरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ८७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच रद्द करण्यात आली रणजी ट्रॉफी स्पर्धा
- शेतकऱ्यांनी मागे हटू नये, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत – राहुल गांधी
- खासदारांचा १०० कोटींच्या घोटाळ्याचा दावा, वक्फ बोर्ड जमिन प्रकरण
- भाजपाशीच संबंधित एका गटाने दिल्लीत गोंधळ घडवला; संजय राऊत यांचा गंभीर आरोप
- पिस्तूल दाखवून ओव्हरटेक करणाऱ्या कथित शिवसैनिकांचा व्हिडीओ व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

