मुंबई : कोरोना परिस्थितीमुळे बॉलीवूड मधील बरेच प्रोजक्ट पुढे ढकलण्यात आले, अनलॉक नंतर बॉलीवूड मधील सिनेमांची शूटिंग परत सुरु करण्यात आली, परिस्थिती पुरेशी स्थिर झाल्यावर पुन्हा काम सुरू करण्यासाठी सुपरस्टार आपले आगामी वेळापत्रक ठरवत आहेत.
लॉकडावून मुळे बरेच चित्रपट थिएटर मध्ये प्रदर्शित करता आले नाही. म्हणून बरेच चित्रपट ‘ओटीटी प्लेटफ़ॉर्म्स’ वर प्रदर्शित करण्यात आले. दरम्यान आता देशभरात सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून, विविध उद्योग पुन्हा एकदा सुरू केले जात आहेत.
मार्च महिन्यापासून बंद असलेले सिनेमागृह आता अखेर उघडण्यात येणार आहेत. 15 ऑक्टोबरपासून सिनेमागृह उघडण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. १५ ऑक्टोबर पासून चित्रपटगृह सुरू झाल्यानंतर अभिनेता विवेक ऑबेरॉय स्टारर ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.
यावर आता चित्रपट समिक्षक राजा सेन यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. राजा सेन ट्विटमध्ये असे म्हणाले, ‘हॅट्स ऑफ! प्रेक्षक चित्रपटगृहात येऊ नये म्हणून उत्तम मार्ग.’ या गमतीशीर ट्विट ची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा चालू आहे.
Hats off. Genuinely the best way to ensure nobody returns to movie theatres. ???? pic.twitter.com/e5Bt6yt22o
— Raja Sen (@RajaSen) October 10, 2020
महत्वाच्या बातम्या-
- #Corona : कॉन्टक्ट ट्रेसिंगमध्ये लातूर पॅटर्न ठरतोय आदर्श
- निवडणूक आयोगानं शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ नाकारत ‘बिस्किट’ दिलं
- रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा – पडळकर
- भारतात गांजा कायदेशीर झालाच पाहिजे ; अभिनेता रणवीर शौरीचे वादग्रस्त वक्तव्य
- आज बिस्किट वाटपाचा जाहीर कार्यक्रम : वाघ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

