Share

आज बिस्किट वाटपाचा जाहीर कार्यक्रम : वाघ

Published On: 

मुंबई : पुढील महिन्यात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्किट हे चिन्ह दिले. मात्र, हे चिन्ह बदलून देण्याची लेखी मागणी बिहारमधील शिवसेनेकडून आयोगास करण्यात आली असून आता आयोगाच्या निर्णयाची आता प्रतीक्षा आहे.

नितीशकुमार यांचा जनता दल युनायटेड हा पक्ष सत्तेत असून ‘बाण’ हे जदयूचे निवडणूक चिन्ह आहे. शिवसेनेचेही नेमके ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह असल्याने ऐन निवडणुकीत बाण की धनुष्यबाण असा मतदारांचा गोंधळ होतो आणि आमच्या हक्काची मते शिवसेनेला जातात, असा दावा मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी निवडणुक आयोगापुढे केला होता. शिवसेनेला धनुष्यबाण ही निशाणी देऊ नये, अशी मागणीही जदयूने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यावर आयोगाने शिवसेनेला धनुष्यबाणावर निवडणूक लढविता येणार नसल्याचे आदेश दिले आहेत.

तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते मराठा आरक्षण, राज्यातील कोविड स्थिती, धनगर आरक्षण, एमपीएससी परीक्षा, मुंबई लोकलसेवा, संपूर्ण अनलॉक यासह कोणकोणत्या गोष्टींवर भाष्य करणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, भाजप पदाधिकारी अवधूत वाघ यांनी उद्धव ठाकरेंच्या या संवादावर निशाणा साधला आहे. ” आज दुपारी दिड वाजता बिस्किट वाटपाचा जाहीर कार्यक्रम. अवश्य उपस्थित राहुन निखळ मनोरंजनाचा आस्वाद घ्या. सुचना: बिस्कीट बुडवून खाण्यासाठी आपापल्या चहाची सोय आपणच करायची आहे. कार्यक्रम सहयोगी अस्मिता ब्रँड चहा” असं ट्विट करत शिवसेनेला निवडणूक चिन्हावरून चिमटा काढला आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!