मुंबई : तीन दिवसांपूर्वी मनसैनिकांनी राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वसई-विरार शहर महापालिका प्रशासनाच्या कार्यक्रमात घोषणाबाजी करत राडा घातला होता. वसई-विरार महापालिका क्षेत्रामधील समस्या या गंभीर होत असून ‘पालिका आयुक्त आम्हाला वेळ द्या’ अशा घोषणा या कार्यकर्त्यांनी दिल्या होत्या.
यानंतर, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत मारहाण केल्याचे देखील समोर आले होते. तर, फक्त समस्यांसाठी दाद मागितल्यावर अशी वागणूक देत शिवीहाल दिल्याप्रकरणी मनसेने आक्रमक भूमिका घेत संबंधित पोलिसांच्या निलंबनाची मागणी केली होती. ज्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्या कार्यकर्त्यांची भेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे.
हे कार्यकर्ते कृष्णकुंजवर दाखल झाले होते. ज्या गालावर पोलिसांनी मारलं होतं त्याच गालावर राज ठाकरे यांनी मायेचा हात फिरवल्याचं यावेळी दिसून आलं. याबाबत मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. ‘पाठीवर हात ठेवून फक्त लढा म्हणा.. ज्या गालावर कर्तव्यशून्य अधिकाऱ्याने मारलं त्याच गालावर साहेबांनी प्रेमाचा हात ठेवला.. माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या कुटुंबाला नेहमीच गर्व वाटेल कि त्यांचा मुलगा राज साहेबांसोबत आहेत.. आज साहेबांनी पुन्हा एकदा तेच दाखवून दिल.’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
https://twitter.com/avinash_mns/status/1347817360774848512?s=20
महत्वाच्या बातम्या
- #भंडारा दुर्घटना : कोणत्याच पालकांना हे दु:ख पाहायला लागू नये : रितेश देशमुख
- #भंडारा दुर्घटना : दोषींना कडक शासन करणार, कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही- अजित पवार
- माझ्या बाळाला शेवटचं तरी भेटू द्या हो… मायेचा पाझर फुटलेल्या आईने फोडला हंबरडा
- #भंडारा दुर्घटना : भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल : टोपे
- भंडारा शासकीय रुग्णालयाच्या नवजात बालक अतिदक्षता कक्षात आग; 10 बालकांचा मृत्यू


