Share

#भंडारा दुर्घटना : कोणत्याच पालकांना हे दु:ख पाहायला लागू नये : रितेश देशमुख

Published On: 

🕒 1 min read

भंडारा :- महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रात्री उशिरा नवजात बालकांच्या दक्षता विभागाला लागलेल्या आगीत होरपळून १० बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

नवजात बालकांचं वय एक महिने ते तीन महिन्यांचं होतं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. वार्डमध्ये एकूण १७ बालकं होती त्यातील सात बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. परंतु, १० बालकांचे प्राण मात्र वाचवले जाऊ शकले नाहीत.

या दुर्दैवी घटनेमुळे अवघा देश हादरला आहे. या घटनेवर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत असून दोषी असणाऱ्या व्यक्तींना कठोर शिक्षा दिली जावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

दरम्यान, या घटनेवर आता अभिनेता रितेश देशमुख याने प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये म्हटले की,ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. अत्यंत दु:खद. कोणत्याच पालकांना हे दु:ख पाहायला लागू नये. ज्यांनी आपले बाळ गमावले आहे. त्या सर्व कुटुंबियांना सामर्थ्य मिळो. माझी प्रार्थना त्यांच्यासोबत आहे. या प्रकरणी चौकशी करण्याची गरज आहे. निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असल्यास दोषींवर शिक्षा व्हायला हवी.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!