भंडारा : महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा रुग्णालयात आज रात्री २ च्या सुमारास नवजात बालकांच्या दक्षता विभागाला लागलेल्या आगीत होरपळून १० बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नवजात बालकांचं वय हे अवघ्या काही दिवसांचं ते महिन्यांचं होतं. काही बालके हे अवघ्या एक दिवसांचं देखील होतं. यानंतर, देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते उद्धव ठाकरेंपर्यंत सर्वानी याची दखल घेऊन संवेदना व्यक्त केली. दोषी कोण? कारवाई काय होणार? मदतीच्या घोषणा हे सर्व सद्या सुरु आहे. मात्र, नऊ महिने आपल्या पोटात तो जीव वाढवला, त्याच्याबाबत स्वप्न बघितली त्या आईच्या डोळ्यात मात्र आता अश्रूंविना काही एक राहिलेलं नाही.
कारवाई होईल, मदतही दिली जाईल पण गलथान कारभारामुळे तो गेलेला जीव परत येणार नाही याने आई-वडिलांच्या डोळ्यात मात्र आसवांचा डोह दाटला आहे. आयुष्याच्या कष्टातून आपला संसार हाकत असताना अवघं कुटुंबच या घटनेनं कोसळल्यानं हताश पालकांच्या भावना कोणीच समजू शकणार नाही.
‘माझ्या बाळाला शेवटचं तरी भेटू द्या हो’ असा एका आईने हंबरडा फोडला दगडालाही पाझर फुटेल अशी आर्त साद त्या मातेने दिली. या घटनेत अधिकाधिक बालिकांचा मृत्यू झाल्याने महाराष्ट्राने आपल्या लक्ष्मी गमावल्या आहेत. आता या घटनेनंतर या पालकांवर नियतीनेच आघात केल्यानंतर कोणाच्या हलगर्जीपणामुळे ही बाब घडली त्यांना कायद्याने शिक्षा तर होईलच मात्र भविष्यात अशा दुर्दवी घटनेने आणखी कोणाचा जीव जाऊ नये एवढीच प्रार्थना…
महत्वाच्या बातम्या
- मुस्लिमही मुलांचे नाव औरंगजेब ठेवत नाही, मग शहराचे नाव औरंगाबाद का? आ. दानवे यांचा सवाल
- ‘संभाजीनगर’ला कोणी विरोध करत असेल तर करू द्या, हरकत नाही’, शिवसेनेचा कॉंग्रेसला अप्रत्यक्ष टोला
- #भंडारा दुर्घटना : दोषींना कडक शासन करणार, कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही- अजित पवार
- जाणून घ्या भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयातील दुर्घटना कशी घडली ?
- #भंडारा : मी तिथे उपस्थित नसलो तरी आपण सर्व एकत्र आहोत; ठाकरेंनी व्यक्त केली हळहळ


