🕒 1 min read
मुंबई : मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईमध्ये मेळावा आयोजित केला होता. नारायण राणे, छगन भुजबळ, यांच्या बंडखोरीचा दाखला दिला जातो, मात्र त्यासोबतच राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केल्याच्या घटनेला देखील राजकीय विश्लेषणाकडून उल्लेख केला जातो. याबाबत बोलत असताना राज ठाकरे यांनी मातोश्रीवर झालेल्या एक भावुक भेट बाबत प्रसंग लोकांपुढे मांडला.
राज ठाकरे यांनी कुठलाही बंड केला नाहीः
गेल्या दोन अडीच वर्षात महाराष्ट्रात जे काही चाललं ते महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच छगन भुजबळ, नारायण राणे आणि नुकती झालेली एकनाथ शिंदे यांच्या गटाची बंडखोरी या कुणाशीही आपली तुलना करू नका. मी बाळासाहेब ठाकरेंना सांगून शिवसेनेतून बाहेर पडलो होतो, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
मी बाळासाहेबांकडे गेलो होतो तेव्हा तिथं मनोहर जोशी उपस्थित होते. ते खोलीच्या बाहेर गेले. मनोहर जोशी बाहेर गेल्यानंतर तिथं मी आणि बाळासाहेब ठाकरे असं दोघेच होतं. बाळासाहेबांनी हात पसरले आणि मला मिठीत घेतलं आणि “आता जा”, असं म्हणाले. मी दगा फटका करून बाहेर पडलो नाही तर तुमच्या विश्वासावर बाहेर पडलो, तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
भुजबळ, राणे, शिंदे यांच्या बंडांच्या यादीत मला घेऊ नका. हे सगळे एका पक्षात गेले, सत्तेत गेले, पण मी बाळासाहेब ठाकरे यांना भेटून बाहेर पडून माझा स्वतःचा पक्ष तयार केला, असं राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.
यादरम्यान, मी कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसून बाहेर पडलेलो नाही. कुठल्या दुसऱ्या पक्षातही गेलेलो नाही. आजपर्यंत आपल्या पक्षाने जेवढी आंदोलने केली तेवढी कोणत्याही राजकीय पक्षांनी केली नाहीत आणि यशस्वी ही झाली नाहीत, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्याः
- Thackeray vs Shivsena | शिवसेना कुणाची? प्रकरण ३ न्यायाधीशांच्या खंडपीठाडे, २५ ऑगस्टला होणार फैसला?
- Shivsena | सुनावणीची तारीख लवकर घ्या!, शिवसेना कडून सर्वोच्च न्यायालयात नवीन याचिका
- Assembly Session 2022 | “५० खोके, ५० खोके, खावून, खावून माजले बोके” ; विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन
- Rakesh Tikait | भाजप यांचं फोडाफोडीचा राजकारण रोखण्यासाठी आता… तुमचा देखील उद्धव ठाकरे होईल, राकेश टिकैत यांचा हल्लाबोल
- Sapna Chaudhary | सपना चौधरी अडचणीत, न्यायालाकडून अटक वाॅरंट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
