मुंबई : आज देशभरात महात्मा गांधी (Mahatma Gandhi Jayanti) यांची जयंती साजरी केली जात आहे. गांधी जयंती वरुन अनेक नेत्यांनी ट्वट केले आहेत. अशातच मनसे नेते राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील पोस्ट केलं आहे. यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांचे सिद्धांत सांगत त्यांना अदरांजली वाहिली आहे. फेसबुकवर राज ठाकरे यांनी पोस्ट केलं आहे.
महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असं नेतृत्व असेल की, जे देशांच्या सीमा तोडून पसरत गेले. तेही इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल नसताना, असं राज ठाकरे म्हणाले.
गांधींजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की, फक्त भारतच नव्हे तर जवळपास तीन खंडातील देशांमध्ये स्वातंत्र्याची आस जागृत झाली आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला. पण जे गांधीजींना जमलं ते पुढे जवळजवळ कोणालाच जमलं नाही. विशिष्ट राजकीय-सामाजिक परिस्थितीत प्रबळ वाटणारे नेते आले, कमालीचे लोकप्रिय झाले आणि पुढे काही वर्षातच मागे पडलेले दिसले आहेत. दुसरं महायुद्ध जिंकल्यावर चर्चिल, जगाला फॅसिझमच्या विळख्यातून सोडवणारा तारणहार म्हणून पुढे आले, पण त्यांची लोकप्रियता पुढे झपाट्याने ओसरली असल्याचं ठाकरेंनी लिहिलं आहे.
ह्याला कारण चर्चिल ह्यांचं योगदान एका विशिष्ट परिस्थितीला पूरक होतं, ते चिरकाल टिकावं असं नव्हतं, पण गांधीजींचं तत्वज्ञान व्यापक होतं. शृंखला मग त्या अज्ञानाच्या असोत, की गुलामगिरीच्या, वसाहतवादाच्या की जातींच्या, त्या शृंखलांनी कुठल्याही माणसाला बांधून ठेवण्याचा अधिकार कोणालाच नाही, कारण सगळी माणसं ही मुळात समान आहेत, इतकं सोपं तत्व त्यांनी स्वीकारलं आणि त्यासाठी त्यांनी संघर्ष केला, असं देखील राज ठाकरेंनी लिहिलं आहे.
हे खूप कठीण आणि दुर्मिळ आहे, म्हणूनच गांधीजींसारखा बहुदा दुसरं कोणी होणे नाही. आज महात्मा गांधी जयंती. गांधीजींच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन, अशा पद्धतीने राज ठाकरेंनी अदरांजली वाहिली
महत्वाच्या बातम्या :
- Instagram New Feature | इंस्टाग्राम (Instagram) ने लाँच केले नवीन फीचर, काय आहे ते जाणून घ्या!
- Uddhav Thackeray | “… त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसमध्ये जाण्याची तयारी केली होती”
- Kishori Pednekar | प्रतापराव जाधवांच्या ‘त्या’ आरोपाला किशोरी पेडणेकरांचे प्रत्युत्तर; म्हणाल्या…
- Special Offer | झिरो डाऊनपेमेंट सह खरेदी करा ‘होंडा ॲक्टिवा’
- Siddhu Moosewala | प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकंडातील ‘हा’ आरोपी पहाटे फरार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

