Share

Instagram New Feature | इंस्टाग्राम (Instagram) ने लाँच केले नवीन फीचर, काय आहे ते जाणून घ्या!

Published On: 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरील इंस्टाग्राम हे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. इंस्टाग्राम देखील आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर लाँच करत असते. त्यामुळे वापरकर्ते इंस्टाग्रामकडे अजून आकर्षित होतात. इंस्टाग्राम ने नुकतेच आपले Notes हे नवीन फीचर लाँच केले आहे. या फीचरद्वारे वापरकर्ते छोट्या छोट्या नोट्स बनवू शकतात. या बनवलेल्या नोट्स इंस्टाग्रामच्या DM सेक्शन मध्ये फॉलोवर्स स्टोरीज प्रमाणे बघू शकतील. या स्टोरीज ला फॉलोवर्स जे काही रिएक्शन देतील ते तुम्हाला DM म्हणून दिसतील. या नवीन Notes फीचर चा मुख्य उद्देश म्हणजे नवीन पद्धतीने वेगवेगळी माहिती इतरांपर्यंत पोहोचवणे आहे.

सध्या वापरकर्ते एकावेळी एकच नोट पोस्ट करू शकतात. ही नोट इंस्टाग्राम स्टोरी प्रमाणे 24 तासापर्यंत तुमच्या फॉलोवर्सना दिसेल आणि त्यानंतर ऑटोमॅटिक डिलीट होऊन जाईल. इंस्टाग्राम नोट्स ला 60 अक्षरांची मर्यादा आहे.

या नवीन इंस्टाग्राम फीचरचा वापर कसा करायचा ?

या नवीन नोट्स विचार चा वापर कसा करायचा ते जाणून घेऊया:

  • सर्वप्रथम इंस्टाग्राम ॲप ओपन करा.
  • त्यानंतर इंस्टाग्राम वरील DM सेक्शन मध्ये जा.
  • तिथे तुम्हाला Your Note ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • ओपन झालेल्या पेजवर तुमच्या मनात जे काही असेल ते लिहा.
  • ही नोट तुम्हाला कोणासोबत शेअर करायची आहे ते देखील तुम्ही इथे निवडू शकता.
  • ही नोट कोणाला दाखवायची हे सिलेक्ट केल्यावर शेअर बटन वर क्लिक करा.
  • यानंतर तुमची नोट शेअर झालेले असेल.

या नोट्स फक्त 24 तासांसाठी दिसतील

इंस्टाग्राम स्टोरीज प्रमाणे या नवीन नोट्स फीचरची व्हॅलिडीटी सुद्धा 24 तास आहे. नोट पोस्ट केल्यावर तुमचे फॉलोवर 24 तासापर्यंत ती नोट बघू शकतील. आणि 24 तासानंतर ती नोट इंस्टाग्रामद्वारे डिलीट केली जाईल. या नोट साठी 60 शब्दांची शब्द मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!