🕒 1 min read
मुंबई : येत्या 5 तारखेला शिंदे गटाचा दसरा मेळावा (Dasara Melava) बीकेसी मैदानावर होणार आहे. तर उद्धव ठाकरे यांचा मेळावा शिवाजीपार्कवर होणार आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून शक्ती प्रदर्शन करण्याची कामं सुरू आहेत. तसेच एकमेकांवर टोलेबाजीही सुरू आहे. अशातच अशातच शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर चांगलाच हल्ला केला आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण (Ashok Chavan) मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसमध्ये (Congress) जाण्याची तयारी केली होती, असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या ‘रोखठोक’मध्ये केला आहे. त्यांनी सांगितले की, काँग्रेस-राष्ट्रवादीवर एकनाथ शिंदे आज टीका करतात. पण महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी दिल्लीत काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल (Ahamad Patel) यांच्याशी संधान बांधले होते. तेव्हाही त्यांच्या मनात वेगळे विचार होते. मात्र सौदेबाजी फिसकटली.
एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी संधान बांधले होते व 15 ते 20 आमदारांसह येतो, गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपद द्या ही चर्चा त्यांनी सुरू केली होती, असे ठामपणे सांगणारे आहेत. त्याला आजही प्रत्यक्षदर्शी आहेत. शिंदे काँग्रेसशी चर्चा करीत आहेत ही पहिली खबर (एफआयआर) तेव्हा भाजपनेच उद्धव ठाकरे यांच्याकडे नोंदवली असल्याचंही रोखठोकमध्ये म्हटलं आहे.
एवढेच नाही तर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी देखील यासंदर्भात एक गौप्यस्फोट केला आहे. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस बरोबर जाण्यास विरोध केला नव्हता. तसेच काँग्रेस बरोबर गेल्याने ठाकरे-दिघे यांच्या हिंदुत्ववादीच्या विचारांचा वारसा मोडून पडेल असंही त्यांना वाटलं नव्हतं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर चांगलाच निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Siddhu Moosewala | प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकंडातील ‘हा’ आरोपी पहाटे फरार
- Chandrashekhar Bawankule | “उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे टोमणे सभाच असणार, अशाने महाराष्ट्राचं…”; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- Big Boss 16 | चला भेटूया बिग बॉस 16 (Big Boss 16) च्या सदस्यांना
- Prataprao Jadhav | “मातोश्रीवर प्रत्येक महिन्याला…”; शिंदे गटातील नेत्याचा खळबळजनक आरोप
- Shivsena | “शिंदे गटात सामील व्हा, नाहीतर तडीपार करून एन्काउंटर…”; शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला धमकी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
