Share

IPL 2022 GT vs PBKS : धवनची गब्बर खेळी अन् लिव्हिंगस्टोनचा फिनिशिंग टच..! सुसाट गुजरातला पंजाबनं रोखलं!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सचा (GT vs PBKS) ८ गडी राखून सहज पराभव केला. या सामन्यात गुजरातचा कप्तान हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे गुजरातचा संघ २० षटकात ८ बाद १४३ धावांपर्यंतच पोहोचू शकला. पंजाबकडून रबाडाने ४ बळी घेतले. प्रत्युत्तरात शिखर धवनचे नाबाद अर्धशतक आणि लियाम लिव्हिंगस्टोनची स्फोटक खेळीच्या जोरावर पंजाबने १६व्या षटकातच हा विजय मिळवला.

पंजाबचा डाव

गुजरातच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबने जॉनी बेअरस्टोला शिखर धवनसोबत सलामीला पाठवले. पण तो एका धावेवर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर धवनने भानुका राजपक्षेसोबत ८७ धावांची भागीदारी केली. धवनने अर्धशतक पूणे केले, तर राजपक्षेला लॉकी फर्ग्युसनने पायचीत पकडले. राजपक्षेने ५ चौकार आणि एका षटकारासह ४० धावा केल्या. त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोनने चाहत्यांचे मनोरंजन केले. त्याने शमीला १६व्या षटकात ११७ मीटर लांब इतका मोठा षटकार ठोकला. त्याने या षटकात ३ षटकार आणि २ चौकार ठोकत सामना संपवून टाकला. लिव्हिंगस्टोनने १० चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ३० तर धवनने ८ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ६२ धावांची खेळी केली.

गुजरातचा डाव

वृद्धिमान साहा आणि शुबमन गिल यांना गुजरातला चांगली सुरुवात करून देता आली नाही. शुबमन (९) धावबाद झाला, तर साहा (२१) कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर माघारी परतला. हार्दिक पंड्याही एका धावेवर बाद झाला. रबाडाने ४ बळी घेत गुजरातला झुकवले. मधल्या फळीत साई सुदर्शनने अर्धशतकी झुंज दिली. त्याने ५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ६४ धावा केल्या. २० षटकात गुजरात ८ बाद १४३ धावांपर्यंत पोहोचला. रबाडाने ३३ धावांत ४ बळी घेतले.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!