Share

IPL 2022 : टी नटराजन आणि चहलच्या समान विकेट्स; मग पर्पल कॅपचा मानकरी कोण? नक्की वाचा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने (Yuzvendra chahal) आयपीएलच्या १५व्या हंगामात शानदार गोलंदाजी केली आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्सचा संघ पॉइंट टेबलमध्ये टॉप-५ मध्ये कायम आहे. त्याच वेळी, सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाज टी नटराजनने (T natrajan) युजवेंद्र चहलची बरोबरी केली आहे. तरी टी नटराजन पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आहे.

सनरायझर्स हैदराबादचा (SRH) गोलंदाज टी नटराजनने आपल्या धारदार गोलंदाजीने खूप प्रभावित केले आहे. त्याने ६ सामने खेळून १२ विकेट घेतल्या आहेत. त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम गोलंदाजी ३७/३ आहे. विकेट घेण्याच्या बाबतीत त्याने राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहलची बरोबरी केली आहे. दोन्ही गोलंदाजांकडे सध्या १२ -१२ विकेट आहेत.

चहलकडे पर्पल कॅप का?

युजवेंद्र चहल (Yuzvendra chahal) सध्या पर्पल कॅपसह पहिल्या स्थानावर आहे. कारण त्याने अवघ्या ५ सामन्यात १२ बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. ज्यासाठी त्याला पर्पल कॅप देण्यात आली आहे. तर टी नटराजनने (T natrajan) ६ सामने खेळून १२ विकेट घेतल्या. म्हणजेच चहलपेक्षा एक सामना जास्त खेळला. तसेच चहलचा इकॉनॉमी रेटही ६. ८० आहे. ज्यामुळे तो पर्पल कॅपच्या यादीत अव्वल आहे.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!