Share

‘या’ रेड्याला होतेय १ कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्याची मागणी!

Published On: 

अहमदनगर : कृषी प्रदर्शनात गजेंद्र रेड्याची चर्चा अधिक असते. सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे पार पडलेल्या कृषी प्रदर्शनात दीड टन वजनाचा हा गजेंद्र रेडा आकर्षणाचा बिंदू ठरला होता. हाच रेडा जिल्यातील राहुरी येथील पार पडत असलेल्या कृषी प्रदर्शनात सर्वांचे लक्ष वेधत आहे.

या रेड्याला गेल्या ४ महिन्यापूर्वी एका शेतकऱ्याने ८० लाख रुपयांत खरेदी करण्यासाठी तयारी दर्शविली होती. पण विलास नाईक या मालकाने साफ नकार दिला होता. यानंतर फक्त ४ महिन्यात ८० लाख रुपयांऐवजी १ कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यासाठी मागणी केली होती, तरीही मालकाने हा रेडा घरची पैदास असल्यामुळे विकण्यास साफ नकार दिला.

गजेंद्र हा रेडा मुरा जातीचा रेडा आहे. सर्व ठिकाणच्या कृषी प्रदर्शनात या रेड्याचे दर्शन घडतेच. या रेड्याचे वजन तब्बल दीड टन आहे. गजेंद्र हा मुळचा कर्नाटकातील मुंगसुळी या गावच्या विलास नाईक यांच्या मालकीचा आहे.

या रेड्याचा खुराक आपण पाहिला तर दिवसाला ३ किलो भरडा, ३ किलो आटा, ५ किलो सफरचंद, उस, गवत इत्यादी खाद्य गजेंद्रला लागते. तसेच या रेड्याला १५ लिटर दुधही लागते. हा रेडा नाईक यांच्या मुरा म्हशींचा आहे. विशेष म्हणजे या रेड्याचे वय केवळ ४ वर्ष ५ महिने आहे.

महत्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!